नाशिक : ‘बेझॉर’ किंवा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली.या आजाराने ग्रस्त रुग्णास खडू, माती यासारख्या वस्तू खाण्याचा मोह होतो; मात्र कृष्णा सोमल्या सांबर यांना चक्क लोखंड अर्थात चलनातील नाणी गिळण्याचीच सवय जडली होती़ डॉ़ अमित केले यांनी सुमारे साडेतीन तास शस्त्रक्रिया करून सांबर यांना जीवदान दिले़पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील थोरातपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यावर सांबर हे पत्नी व पाच मुलांसह राहतात. तरुणपणी गिळलेली काही नाणी गुदद्वारामार्फत बाहेर पडली, तर काही नाणी पोटातील जठराच्या आतील भागात अडकून पडली़ तीन वर्षांपासून सतत उलट्या व खाल्लेले अन्न पचत नसल्याने त्यांनी कल्याणला तपासणी केली, मात्र निदान झाले नाही़पाणी व ज्यूस यावर तीन वर्षांपासून जगत असलेल्या कृष्णा यांची प्रकृती अत्यंत खराब झाल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या ओळखीतून त्यास येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ डॉ़ अमित केले यांनी एक्सरे काढला. त्यामध्ये जठराच्या आतील भागात केवळ एक धातूचा तुकडा असल्याचे दिसत होते़ जठरामध्ये अन्न असल्याने प्रथम ते साफ केले. त्यानंतर एण्डोस्कोपीमध्ये कृष्णाच्या जठरामध्ये चलनातील नाणी असल्याचे दिसले़ भूलतज्ज्ञ डॉ़ कासलीवाल व डॉ़ शिल्पा सोनवणे यांनी भूल दिल्यानंतर डॉ़ मोरे व डॉ़ विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ़ केले यांनी शस्त्रक्रिया केली.नाण्यांचे मूल्य १६३ रुपयेसांबर यांनी गिळलेल्या नाण्यांचे मूल्य १६३ रुपये आहे़ त्यात दहा रुपयांची दोन, पाच रुपयांची १७, दोन रुपयांची २१, एक रुपयाची १४ व ५० पैशांची चार नाणी होती. पाच लोखंडी वायसर व एक नटही काढण्यात आला आहे़
मनोरुग्णाच्या पोटातून काढली तब्बल ७२ नाणी, जीव वाचला; पालघरच्या रुग्णावर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:17 AM