शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

आषाढीनिमित्त सोडणार ७२ विशेष रेल्वेगाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 4:07 AM

पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातूर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

पुणे - पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातूर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेºया होतील. ही गाडी दि. २२ जुलैला मध्यरात्री १२.२० वाजता मुंबई स्थानकातून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.०५ वाजता मिरज स्थानकात पोहोचेल. तर, दि. २३ जुलैला रात्री ८.५५ वाजता मिरज स्थानकातून परतीचा प्रवास सुरू होईल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, धालगाव हे थांबे असतील.पंढरपूर-कुर्डूवाडी या गाडीच्या १२ फेºया होणार आहेत. ही गाडी दि. २०, २१, २२, २७, २८, २९ जुलैला दुपारी १.३५ वाजता पंढरपूर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. तर, त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता कुर्डूवाडी स्थानकातून पंढरपूरकडे प्रस्थान करेल.मिरज व पंढरपूर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमूसोडण्यात येईल. ही गाडी मिरज स्थानकातून सकाळी ५.३० वाजता, तर पंढरपूर स्थानकातून सकाळी ९.५० वाजता सुटेल. मिरज व कुर्डूवाडीदरम्यानही अनुक्रमे दुपारी २.४० व रात्री ८.३० वाजता डेमू गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.नवी अमरावती ते पंढरपूर चार फेºयानवी अमरावती ते पंढरपूर अनारक्षित गाडीच्या चार फेºया होतील. ही गाडी दि. १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता नवी अमरावती स्थानकातून सुटून दुसºया दिवशी ११.१५ वाजता पंढरपूर येथे पोहचेल. तर पंढरपूर येथून दि. १८ व २४ जुलैला दु. ४ वाजता सुटेल. खामगाव ते पंढरपूर ही गाडी दि. १९ व २५ जुलैला सकाळी ११.१५ वाजता खामगाव स्थानकातून पंढरपूरकडे रवाना होईल. तर, पढरपूर स्थानकातून त्याच दिवशी सकाळी दुपारी ४ वाजता निघेल. लातूर ते पंढरपूर ही दि. २०, २३, २४, २५ व २७ जुलैला सकाळी ७.४५ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करेल, तर त्याच दिवशी दुपारी २ वाजता पंढरपूर स्थानकातून सुटेल.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीIndian Railwayभारतीय रेल्वे