ठाणे - २०१८ सुरू असताना २०१९मधील काही सण, समारंभ किंवा पिकनिकसाठी सुट्ट्यांचे प्लानिंग करत असाल तर नोकरदार, बच्चेकंपनीसाठीखूशखबर आहे. २०१९मध्ये तीन सुट्या वगळता उरलेल्या २१ सुट्या इतर वारी येणार असून, रविवारसह एकूण ७३ सुट्यांचा आनंद घेता येणार आहे.पुढील वर्ष अर्थात २०१९च्या दिनदर्शिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील वर्षीच्या सुट्ट्यांचे दिवस सांगितले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मीपूजन आणि ईद-ए िमलाद या तीन सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात रविवारला जोडून शनिवार किंवा सोमवारी येणाऱ्या सुट्यांची संख्या अनुक्रमे पाचआणि चार आहे. तर दुसरा किंवा चौथा शनिवार, नंतर रविवार आणि सोमवारचीही सुटी असा वीकेण्ड प्लान करण्याची संधी नोकरदारांना एकदा मिळणार आहे. पुढील सुट्यांमध्ये मुस्लीम धर्माच्या सुट्याही दिल्या असल्या तरी त्यांचे दिवस चंद्रदर्शनाप्रमाणे एक दिवसाने बदलू शकतात. सरकारसुट्यांची अधिकृत यादी नंतर प्रसिद्ध करते, असेही पंचागकर्ते सोमण यांनी सांगितले.अशा असतील सुट्याप्रजासत्ताक दिन : शनिवार, २६जानेवारी, छत्रपती शिवाजीमहाराज जयंती - मंगळवार, १९फेब्रुवारी महाशिवरात्री -सोमवार, ४ मार्च, धूलिवंदन -गुरु वार, २१ मार्च गुढीपाडवा -शनिवार, ६ एप्रिल, श्रीरामनवमीशनिवार, १३ एप्रिल, डॉ.आंबेडकर जयंती - रविवार, १४एप्रिल, श्रीमहावीर जयंती -बुधवार, १७ एप्रिल, गुडफ्रायडे- शुक्र वार, १९ एप्रिल, महाराष्ट्रदिन - बुधवार, १ मे, बुद्धपौर्णिमा - शनिवार, १८ मे,रमजान ईद - बुधवार, ५ जून,बकरी ईद - सोमवार, १२आॅगस्ट, स्वातंत्र्य दिन -गुरु वार, १५ आॅगस्टपतेती - शनिवार, १७ आॅगस्ट,श्रीगणेश चतुर्थी - सोमवार, २सप्टेंबर, मोहरम - मंगळवार, १०सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती -बुधवार, २ आॅक्टोबर, विजयादशमी (दसरा) - मंगळवार, ८आॅक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन- रविवार, २७ आॅक्टोबर,दिवाळी बलिप्रतिपदा -सोमवार, २८ आॅक्टोबरईद-ए-मिलाद - रविवार, १०नोव्हेंबर, गुरु नानक जयंती -मंगळवार, १२ नोव्हेंबर, नाताळ- बुधवार, २५ डिसेंबर
पुढील वर्षात रविवारसह मिळणार ७३ सुट्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:08 AM