पुणे : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सध्या राज्यात ‘लॉकडाऊन’ असल्याने महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी घरबसल्या गेल्या महिन्यात १,२२७ कोटी २५ लाखांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला. यात सर्वाधिक पुणे परिमंडलातील १३ लाख ५० हजार तर त्यानंतर भांडूप परिमंडलातील ११ लाख वीजग्राहक आहेत.सद्य:स्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. तसेच येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे देखील बंद आहेत. मात्र, वीजग्राहकांनी महावितरणची वेबसाईट, मोबाईल अॅप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यायाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.गेल्या महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी प्रतिसाद देत तब्बल १,२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा घरी बसून केला. ‘लॉकडाऊन’मुळे महावितरणने २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद केले आहे. मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबिल पाठविण्यात येत आहे. याशिवाय, वेबसाईट व मोबाईल अॅपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता नि:शुल्क आहेत. .......सर्वाधिक भरणा करणारी पाच परिमंडळेपरिमंडळ ग्राहकसंख्या रुपये (कोटींमध्ये)पुणे १३.५० लाख २६६.२९ भांडूप १०.९९ लाख २३३.६०कल्याण १०.२५ लाख १६४.३९ नाशिक ५.६५ लाख ९४.४१ बारामती ५.६३ लाख ७१.०९
लॉकडाऊनमुळे ७३ लाख ग्राहकांनी केला ‘ऑनलाईन’ बाराशे कोटीं वीजबिल भरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 1:12 PM
पुण्यातले सर्वाधिक : घरबसल्या भरणा करा
ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’मुळे महावितरणने २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण केले बंद वेबसाईट व मोबाईल अॅपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध