शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 6:55 AM

१९ जिल्ह्यांतील ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ १६ तालुक्यांत आहे. एकंदरीत ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही स्थिती जूनअखेरपर्यंत राहिल्यास राज्यातील परिस्थिती भीषण होण्याची शक्यता आहे, याकडे पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.

मुंबई : राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तरीही राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याची टीका शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

राज्यात यंदा पिण्याचे पाणी पुरवण्यास १०,५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते. यावरून दुष्काळाचे गांभीर्य लक्षात येईल. या परिस्थितीत पीक कर्जांचे पुनर्गठन करावे, पीककर्ज तत्काळ उपलब्ध करून द्यावे, कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी, पीक विमा कंपन्यांना भरपाई देण्यास योग्य ते आदेश द्या, वीज बिलात सूट व वसुलीस स्थगिती द्यावी, मनरेगा कामातील निकष शिथिल करावे, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागण्या पवार यांनी सरकारकडे केल्या आहेत.

याकडे वेधले लक्ष  १९ जिल्ह्यांतील ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ १६ तालुक्यांत आहे. एकंदरीत ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही स्थिती जूनअखेरपर्यंत राहिल्यास राज्यातील परिस्थिती भीषण होण्याची शक्यता आहे, याकडे पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.

मराठवाड्यात १६% साठा मराठवाड्यात १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडीत ५.५० टक्के इतकाच जलसाठा आहे, अनेक धरणे शून्य टक्क्यांवर आली. धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पामध्ये पाच टक्क्यांहून खाली पाणीसाठा शिल्लक राहिला.

पुण्यामध्ये ५० प्रकल्प आहेत, या भागात फक्त २४ टक्के पाणी शिल्लक असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. राज्याच्या कृषिमंत्र्यांचा जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु तेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या हजर नव्हते, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळ