शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

पुण्याजवळ ७४ जणांना विषबाधा

By admin | Published: May 23, 2017 3:07 AM

रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे एका विवाह समारंभात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास ७४ जणांना अन्नातून विषबाधा झाली. रुग्णालयात उपचार केल्यानंतर काहींना घरी सोडून देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे एका विवाह समारंभात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास ७४ जणांना अन्नातून विषबाधा झाली. रुग्णालयात उपचार केल्यानंतर काहींना घरी सोडून देण्यात आले. रोकडे आणि भोगले परिवारातील विवाह समारंभ झाला. त्या वेळी आइसक्रीम खाल्ल्यानंतर काहींना मळमळ, उलटीचा त्रास होऊ लागला. विवाहस्थळी यामुळे एकच गोंधळ उडाला. विवाहानंतर वधू-वरांना आशीर्वाद देऊन निरोप देत असतानाच वर आणि वधू पक्षाकडील लोकांची विषबाधा झालेल्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी धावपळ उडाली. ५४ जणांना औंध रुग्णालयात, तर २० जणांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दोन्ही रुग्णालयांतील १५ जणांना दुसऱ्या दिवशी सकाळी घरी सोडले आहे. इतरांना खबरदारीचा उपाय म्हणून अद्यापही देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वायसीएममध्ये तीन पुरुष, नऊ मुले, सहा महिलांवर उपचार करण्यात आले. एक महिला, तीन पुरुष, दोन मुले यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले, अशी माहिती वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश इंगळे यांनी दिली.