मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाचे ३ हजार ८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १७ लाख ५७ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४४ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर २.५६ टक्के इतका झाला आहे. सध्या ७४ हजार १०४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यात रविवारी काेराेनाच्या ३ हजार ७१७ बाधित रुग्णांचे निदान झाले असून ७० मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत एकूण १८ लाख ८० हजार ४१६ कोरोनाबाधित असून मृतांची एकूण संख्या ४८ हजार २०९ वर गेली आहे. सध्या राज्यात ५ लाख १२ हजार ५८७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ४०३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख २ हजार ४५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.रविवारी नोंद झालेल्या ७० मृत्यूंपैकी ४८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित चार मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. अशी झाली मृतांची नाेंदरविवारी नाेंद झालेल्या ७० मृत्यूंमध्ये मुंबई १२, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा १, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर २, अहमदनगर मनपा २, जळगाव २, जळगाव मनपा १, पुणे ५, पुणे मनपा १, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ३, सोलापूर मनपा ३, सातारा १२, सांगली २, लातूर १, उस्मानाबाद ३, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा १, नागपूर मनपा ३, वर्धा २, भंडारा १, चंद्रपूर मनपा २ आणि अन्य राज्य/देशातील १ रुग्णाचा समावेश आहे.
CoronaVirus News: राज्यात काेराेनाचे ७४ हजार १०४ सक्रिय रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 3:44 AM