शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नक्षलींसाठी जाणारी ७५ लाखांची रोकड हस्तगत

By admin | Published: May 24, 2017 2:48 AM

नक्षलींची प्रसिद्ध पत्रके आणि ७५ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या तेलंगणातील तीन व्यापाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलींची प्रसिद्ध पत्रके आणि ७५ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या तेलंगणातील तीन व्यापाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील रक्कम आणि बोलेरो गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाच्या विशेष अभियान पथकाचे उपनिरीक्षक मिलन कुरकुटे व त्यांचे पथक नक्षलविरोधी अभियान राबवून मध्यरात्री परत येत असताना त्यांना आलापल्ली येथे क्रमांक नसलेले वाहन संशयास्पदरित्या भामरागडच्या दिशेने जाताना आढळले. पथकाने सावरकर चौकात ते वाहन थांबवून तपासणी केली असता गाडीत ७५ लाख रुपये आणि नक्षल पत्रके सापडली. गाडीतील पहाडिया तुळशीराम तांपला, रवी मलय्या तनकम आणि नागराज समय्या पुट्टा (सर्व रा.तेलंगणा राज्य) या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. नक्षलग्रस्त भागात बॅनरयुद्धपश्चिम बंगालमधील नक्षलबारी येथील लढाईला ५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त २३ ते २९ मे या कालावधीत नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन बॅनरच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी केले आहे. दुसरीकडे आदिवासी बचाव समितीच्या नावाने जिमलगट्टा परिसरात बॅनर लावण्यात येऊन नक्षल्यांनी आदिवासींची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही बाजूने पेटलेल्या या बॅनरयुद्धामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.