शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

26 पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्तीसाठी केंद्राकडून 756 कोटींचे कर्ज वितरण

By admin | Published: December 26, 2016 6:36 PM

अल्प व्याजदराने रु. 756 कोटीचे नाबार्ड कर्जाचे वितरण महाराष्ट्र राज्यास करण्यात आले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (AIBP) अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 26 मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्रीय अर्थसहाय्य व दीर्घ मुदतीचे अल्प व्याजदराने रु. 756 कोटीचे नाबार्ड कर्जाचे वितरण महाराष्ट्र राज्यास करण्यात आले. वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमाचा समावेश आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत करण्यात आला असून, आज 26 डिसेंबर, 2016 रोजी इंडियन हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली, केंद्रीय शहरी विकास, सूचना आणि प्रसारण मंत्री सुश्री एम. वैंकय्या नायडू, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीषजी महाजन, केंद्रीय जल संसाधन विभागाचे सचिव शशी शेखर आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यास रु.756 कोटीचे नाबार्ड कर्ज वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात गुजरात राज्यास रु. 463 कोटीचे नाबार्ड कर्ज वितरीत करण्यात आले.देशातील या 99 प्रकल्पात महाराष्ट्रातील 26 अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र शासनाने यापूर्वीच ऑक्टोबर 2016 मध्ये रु. 339.40 कोटीचे अर्थसहाय्याचा पहिला हप्ता उपलब्ध करून दिला होता. या योजनेत वाघुर, बावनथडी, निम्न दुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांझरा, नांदुर मधमेश्वर टप्पा-2, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धोमबलकवडी, अर्जुना ऊर्ध्व कुंडलीका, अरुणा, कृष्णा-वारणा उसिंयो, गडनदी, डोंगरगाव, सांगोला शाखा कालवा, खडकपूर्णा वारणा, मोरणा(गुरेघर), निम्न पेढी, वांग, नरडवे(महमद वाडी), कुडाळी इ. प्रकल्पांचा समावेश आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट झालेले सर्व कामे आता गतीने सुरू आहेत. बावनथडी, निम्न पांझरा हे प्रकल्प पूर्णत्वाचे टप्प्यावर आहेत. नांदुर मधमेश्वर प्रकल्पाअंर्तगत भाम व वाकी धरणाची कामे गतीने सुरू आहेत. धोम बलकवडी प्रकल्पाचे पाणी फलटण तालुक्यात पोहोचले आहे. निम्न पांझरा प्रकल्पातूनही या वर्षी पहिल्यांदाच सिंचनसाठी पाणी उपलब्ध झाले.केंद्र शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील वेगवर्धित सिंचन लाभ योजनेंतर्गत अपूर्ण 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सन 2016-17 ते सन 2019-20 या कालावधीत एकूण रु. 3830 कोटी इतके केंद्रीय अर्थसहाय्य मिळणे अपेक्षित आहे. तसेच राज्य शासनास सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम निश्चितपणे उपलब्ध करून देता यावी, यासाठी नाबार्डच्या माध्यमातून दीर्घकालीन ( 15 वर्षं मुदतीचे ) व सवलतीच्या दरात सुमारे 6% व्याज दराने कर्जाची सुविधा निर्माण करून दिली आहे. या योजनेतून वेगवर्धित सिंचन लाभ योजनेतील 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एप्रिल 2016 ते डिसेंबर 2019 या कालावधीत रु.12773 कोटी इतके कर्जसहाय्य उपलब्ध होणारे आहे. सदर 26 प्रकल्प पूर्ण झाल्यावर 5.56 लक्ष हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.