शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बियाण्यांचे ७६६ नमुने अपात्र

By admin | Published: June 27, 2016 10:43 PM

कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला

बीज परीक्षण प्रयोगशाळेचा रिपोर्ट : शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

नागपूर : कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला फार मोठे नुकसान होते. त्यामुळे बियाणे उत्पादक व पुरवठादार यांना बियाणे कायदा-१९६६ नुसार गुणवत्तापूर्वक बियाणे पुरवठा करणे बंधनकारक ठरते. अशा बियाणे उत्पादकांना बीज परीक्षण प्रयोगशाळेत आपल्या बियाण्यांची तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी विदर्भात केवळ नागपुरात बीज परीक्षण प्रयोगशाळा असून, या अंतर्गत ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे तीन प्रकारच्या बियाणे नमुन्यांची तपासणी केल्या जाते. त्यानुसार या प्रयोगशाळेत मागील वर्षभरात एकूण १८ हजार १३८ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ७६६ नमुने अपात्र ठरले आहेत. यापैकी ६,२७८ नमुने कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी गोळा करून त्यापैकी तब्बल १०७ नमुने अपात्र ठरले आहेत. अनेकदा या बीज परीक्षणाची गरज काय? असा शेतकरी प्रश्न उपस्थित करतात. मात्र जाणकारांच्या मते, जोपर्यंत बियाण्याची उगवण क्षमता माहीत होत नाही, तोपर्यंत प्रति एकर किती बियाणे पेरावे याचा अंदाज लावता येत नाही. शिवाय या तपासणीतून विक्रेते आणि शेतकरी यांना बियाण्यांची उगवण क्षमता, भौतिक शुद्घता, कीडग्रस्त प्रमाण आणि ओडीव्ही याचीही अचूक माहिती मिळते. त्यामुळे प्रत्येक बियाण्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे अनिवार्य ठरते. मागील वर्षी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण बियाण्यांपैकी ४.२२ टक्के बियाणे अपात्र ठरले होते. या उपरोक्त ते बियाणे छुप्या मार्गाने बाजारातून शेतकऱ्यांना विक्री केले जाऊ शकते, अशी बीज परीक्षण अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे, तरी शेतकऱ्यांनी अशा बियाण्यांपासून सावध राहिले पाहिजे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील १ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१६ दरम्यान एकूण १०९ नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी एकही नमुना अपात्र ठरलेला नाही.