4सलाम त्यांच्या कामाला. त्यांच्यामुळेच बचावकार्य व मदतकार्य पूर्ण झाले आहे, असे माळीण येथे गेलो असता अनेक जण बोलत होते. एनडीआरएफच्या 36क् जवानांनी सलग 8 दिवस 24 तास काम करून माळीण येथील अवघड काम पूर्ण केले. माळीण येथील दुर्दैवी घटनेनंतर मदतकार्य लगेच सुरू झाले होते.
4 मात्र, एनडीआरएफचे जवान आल्यानंतर वेग आला. गेले 8 दिवस ते अहोरात्र काम करीत आहेत. आज त्यांच्या चेह:यावर कुठलाही थकवा जाणवला नाही. 145 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 6 व्यक्तींचे अवयव मिळाले आहेत. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा काम कमी असले, तरी जवान अनेक ठिकाणी काम करताना दिसले.
4मराठी शाठेच्या एका खोलीत त्यांचे साहित्य, औषधे होती. बाहेरच्या व्हरांडय़ात हातात वॉकीटॉकी घेऊन संभाषण सुरू होते. सकाळचे जेवण आले, तेव्हा शाळेतील एका खोलीत सांबार-भात हातात घेऊन एनडीआरएफच्या जवानांनी भोजन केले. काही जण तर एका रुग्णवाहिकेत भोजन करताना दिसले.
4काही जवान डोंगरउतारावर शोध घेत होते, तर जेसीबी व पोकलॅनवर बसून उपसलेल्या गाळावर लक्ष ठेवले जात होते. जवळून वाहणा:या ओढय़ात सर्व ढकलून दिले जात होते. त्यामुळे त्याच्या आजूबाजूने फिरून मृतदेहांचा शोध घेतला जात होता. अगदी डिंभे धरणाच्या पाणीसाठय़ावर या जवानांची नजर होती.