शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

स्वाइन फ्लूमुळे राज्यात ८ जणांचा मृत्यू

By admin | Published: March 01, 2015 1:31 AM

स्वाइन फ्लूने राज्यात आणखी८ जणांचा बळी घेतल्याने या वर्षातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १३३ वर पोहोचली आहे.

पुणे : स्वाइन फ्लूने राज्यात आणखी८ जणांचा बळी घेतल्याने या वर्षातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १३३ वर पोहोचली आहे.राज्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी दिवसभरात स्वाइन फ्लूचे १३९ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या वर्षातील लागण झालेल्यांची संख्या १ हजार ६३५ वर पोहोचली आहे. यापैकी २७५ जण रुग्णालयात दाखल असून ३५ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर, १६१ जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. फेब्रुवारी महिन्यापासून डोक वर काढलेल्या स्वाईन फ्लूमुळे दोन मुंबईकरांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ५२५ इतकी झाली असून मुंबई बाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या १७ इतकी झाली आहे. शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी स्वाईन फ्लूचे ४० नवे रुग्ण मुंबईत आढळले असून मुंबई बाहेरून दोन नवे रुग्ण उपचारासाठी आले आहेत. अंधेरी येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा २७ फेब्रुवारी तर अंधेरी येथेच राहणाऱ्या ६८ वर्षीय महिलेचा शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी कोकिलाबेन रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.राज्यात स्वाइन फ्लूची सर्वाधिक तीव्रता नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे या जिल्ह्यांमध्ये आहे. एक जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील १ लाख ४६ हजार ९३९ जणांची नोंद झाली आहे.