मुंबई : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन केले. यावेळी त्यांनी गेल्या तीन वर्षांतील राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.
औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. यामुळे मागील दोन वर्षांत देशात आलेल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी सर्वात मोठा वाटा महाराष्ट्रात आला. तसेच ईपीएफओच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात संघटीत क्षेत्रात आठ लाख रोजगार निर्माण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सध्या सुरु असलेल्या आरक्षण आंदोलनांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले ,की समाज, जाती धर्मातील सौहार्द टिकला तर राज्य पुढे जाईल. पुरोगामित्व ही राज्याची खरी ताकद आहे, ती टिकली पाहिजे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला.