ऑनलाइन लोकमतअकलूज. दि. २ : माढा लोकसभा मतदार संघातील आठ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या २६ मार्च रोजी या कामाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार विजयसिंह मोहिते यांनी माहिती दिली.
नवी दिल्ली येथे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत गडकरी यांची आज भेट घेतल्यानंतर गडकरी यांनी हा निर्णय सांगितला. माढा लोकसभा मतदार संघातील व सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या आठ रस्त्यांच्या विकसाबाबत व त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याबाबत खासदार विजयसिंह मोहिते यांनी नितिन गडकरी यांना निवेदन देवून व प्रत्यक्ष भेटी देवून पाठपुरावा केला होता. त्या संदर्भात आज त्यांनी गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून चर्चा केली.
या वेळी आमदार सुभाष देशमुख हेही उपस्थित होते.सोलापूर जिल्ह्यातून माढा लोकसभा मतदार संघात व पुणे आणि मराठवाड्याकडे जाणारे एकूण आठ रस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समाविष्ट केल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी खा. मोहिते पाटील यांना सांगितले.संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन्ही संतांच्या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणावरही चर्चा झाल्याचे खासदार मोहिते यांनी सांगितले.- हे रस्ते होणार राष्ट्रीय महामार्ग वेळापुर-मळखांबी-नेवरे-करकंब ( २४ किमी)सांगोला-महुद-वेळापुर-अकलुज (६० किमी)टेंभूर्णी-पंढरपूर-मंगळवेढा-विजापूर (१२५ किमी)पुणे-सासवड-जेजूरी-नीरा-लोणंद-फलटण-माळशिरस-पंढरपूर( २८६ किमी.)खामगाव-कळंब-बार्शी-कुर्डुवाडी-पंढरपूर-सांगोला(४५०किमी)सातारा-म्हसवड-माळशिरस-अकलुज-टेंभूर्र्णी-कुर्डुवाडी-बार्शी-येडशी-लातूर(३३८किमी)सातारा-म्हसवड-पिलीव-पंढरपूर(११०किमी)मनमाड-कोपरगाव-शिर्डी-अहमदनगर-बारामती-ङ्खफलटण-विटा-तासगाव-मिरज-चिकोडी(३०० किमी)