नागपूर : आग ओकणा:या सूर्याच्या प्रकोपामुळे नागपुरात उष्माघाताने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक तापमानाचा पशुपक्ष्यांनाही फटका बसला. शुक्रवारी तापमानाने विक्रमी उंची गाठत 47 अंश से. चा टप्पा पार केला. विदर्भात चंद्रपूर, वर्धा व ब्रrापुरीत 47 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
नागपूर पोलिसांनी आठ जणांचे मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी अनोळखी मृतदेह शासकीय इस्पितळांकडे शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
नागपुरात सक्करदरा भागातील धरती डेकोरेशन गोदामाजवळ एक 45 वर्षीय अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. कॉटनमार्केट गेट क्रमांक 1 च्या आत 45-5क् वयोगटातील अनोळखी रिक्षाचालक रिक्षातच मृतावस्थेत आढळला. लकडगंज हद्दीतील जुना भंडारामार्गावरील सुदर्शन चौकातील वाहतूक पोलिसांच्या बुथजवळ अंदाजे 6क्-65 वर्षीय अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली. अजनी हद्दीतील कुंजीलालपेठ येथे अंदाजे 55 ते 6क् वर्षीय इसम मृत आढळला. याशिवाय वर्धा रोड पांजरी रोडवर एका 28 वर्षीय तरुणाचा, विश्वकर्मानगर येथे एका 5क् वर्षीय व्यक्तीचा आणि धरमपेठ खरे टाऊन परिसरात दोन आणि वाडीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. (प्रतिनिधी)
च्3 जून 2क्क्3 मध्ये नागपुरात 47.7 अंश से. तापमानाची नोंद झाली होती. या विक्रमी तापमानापेक्षा फक्त एक अंशाने कमी तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. एकीकडे मान्सून केरळात दाखल झाला असताना दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात मात्र तापमान दिवसेंदिवस वाढत आहे.
तापमान(अंश.से.)
चंद्रपूर47.5
ब्रrापुरी47.5
वर्धा47.2
नागपूर46.7
गोंदिया45.3
तापमान(अंश.से.)
अकोला45.2
अमरावती44.6
यवतमाळ44.8
वाशीम42.8