पुणे : राज्यात खरीपाच्या ११५.७९ लाख हेक्टरवरील (८२ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. भात, ज्वारी आणि नाचणीची सरासरीच्या निम्मी देखील पेरणी आणि लागवडीची कामे झालेली नाहीत. त्यामुळे यंदा या पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठवाड्यात मूग, तूर आणि उडीदाच्या पेरण्या उशिरा झाल्याने या पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. खरीपाचे ऊस पीक वगळून सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, पैकी ११५.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर २६ जुलै अखेरीस पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. तर, उसासह सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून, ११६.४० लाख हेक्टरवर (७८ टक्के) पेरणी-लागवडीची कामे झाली आहेत. राज्यात १ जून ते २६ जुलै दरम्यान सरासरी ५६१ मिलिमीटर पाऊस पडतो. या काळात ४२७.५ मिलिमीटर (७६.२ टक्के) पाऊस झाला. राज्यात ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. उर्वरीत राज्यात सरासरीच्या ५० ते ९९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यात भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार २२१ हेक्टर असून, त्या पैकी ५ लाख ८० हजार ८५१ (३९ टक्के) हेक्टरवरील लागवडीची कामे झाली आहेत. कोकणात ७० आणि कोल्हापूरात ७९ टक्के क्षेत्रावर भात लागवडीची कामे झाली आहेत. पुणे जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ६९ हजार ९७४ हेक्टर असून, त्या पैकी ३० हजार ४७६ हेक्टर (४४ टक्के) क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. कोकण, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या विभागात नाचणीचे सरासरी क्षेत्र १० लाख ९ हजार हेक्टर आहे. त्या पैकी ३९ हजार १३३ हेक्टरवर (३६ टक्के) लागवड झाली. खरीप ज्वारीचे ७ लाख १९ हजार ३७७ हेक्टर क्षेत्र असून, २ लाख ४३ हजार ३०० हेक्टरवर (३४ टक्के) पेरणी झाली आहे. ---------मक्या पाठोपाठ सोयाबीन, भुईमूगावर रोगाचा प्रादुर्भावकोल्हापूर विभागात काही ठिकाणी मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पाठोपाठ भुईमूगावर पाने खाणाºया आणि सोयाबीनवर पाने खाणाºया व पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. औरंगाबाद विभागात मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आणि कापसावर रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
खरीपाच्या ८२ टक्के पेरण्या उरकल्या : तूर-मूगाच्या पेरण्यांना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 12:23 PM
खरीपाचे ऊस पीक वगळून सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, पैकी ११५.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर २६ जुलै अखेरीस पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत...
ठळक मुद्दे भात, नाचणी, ज्वारीच्या क्षेत्रात घटीची शक्यतामक्या पाठोपाठ सोयाबीन, भुईमूगावर रोगाचा प्रादुर्भाव