वाशिम : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर निर्धारित मुदतीच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्थात ३० जुलैपर्यंत ३६ जिल्ह्यातील ८२ लाख ३३ हजार ९७७ शेतकऱ्यांनी शेतकºयांनी पीक विभा हफ्त्याचा भरणा केला आहे. त्यात सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यात मिळाला, तर सर्वात कमी प्रतिसाद रायगड जिल्ह्यात मिळाला आहे.यंदाच्या हंगामात शासनाने राज्यात खरीप पीक विमा योजना राबविण्यास मंजुरी दिली. त्यानंतर १ जुलैपासून शेतकºयांकडून पीकविमा हफ्ता भरून घेण्यास सुरुवात झाली. या योजनेत शेतकºयांचा सहभाग वाढविण्यासाठी कृषी विभागाने विशेष पुढाकार घेत शेतकºयांना मार्गदर्शन केले. विमा कंपन्यांनीही चित्ररथाद्वारे जनजागृती केली; परंतु त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. राज्यात ३० जुलैच्या सायंकाळपर्यंत ८२ लाख ३३ हजार ९७७ शेतकºयांनी विमा हफ्ता भरून पिकांना सुरक्षा कवच दिले आहे. यासाठी शेतकºयांनी ३९९ कोटी २५ लाख ३२ हजार रुपयांचा भरणा पीक विमा कंपन्यांकडे विविध बँकामार्फत केला आहे. त्यात राज्यात सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यातून मिळाला असून, या जिल्ह्यात १ लाख ५९ हजारांहून अधिक शेतकºयांनी खरीप पिकांसाठी विमा हफ्त्याचा भरणा केला आहे. त्या खालोखाल नांदेड, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, अहमदनगर, हिंगोली, सोलापूर आणि अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यांतही या योजनेला समाधानकारक प्रतिसाद लाभला. इतर जिल्ह्यांत मात्र अपेक्षेच्या तुलनेत खूप कमी प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात या योजनेला सर्वात कमी प्रतिसाद रायगड जिल्ह्यातून मिळाला आहे.
राज्यात ८२.३३ लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:18 IST
सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यात मिळाला, तर सर्वात कमी प्रतिसाद रायगड जिल्ह्यात मिळाला आहे.
राज्यात ८२.३३ लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा
ठळक मुद्दे बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद: रायगडात सर्वात कमीबुलडाणा जिल्ह्यातही या योजनेला समाधानकारक प्रतिसाद लाभला.