शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; वेतनासाठी दरमहा ३६० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 7:43 AM

सवलत मूल्यासह ३२० कोटी रुपये दरमहा मिळणार  

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ८५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. राज्य सरकार सवलत मूल्याचे २२० कोटी, यासोबतच अतिरिक्त १०० कोटी रुपये दरमहा एसटी महामंडळाच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या सात तारखेलाच जमा होणार असल्याचे सांगितले जाते.

एसटीकडून विविध २९ प्रकारच्या सवलती दिल्या जातात. यामध्ये ७५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासासोबतच विद्यार्थी, दिव्यांग, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आदींचा समावेश आहे. या प्रवास सवलतीची रक्कम सरकारकडून महामंडळाला दिली जाते. यापोटी दरमहा सुमारे २०० कोटी एवढी रक्कम सरकारकडे थकीत राहते. 

वेतनासाठी दरमहा ३६० कोटीमहामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा ३६० कोटी रुपये लागतात. सरकारकडून ३२० कोटी रुपये मिळतील. त्यामुळे ४० कोटींची तूट पडणार आहे. ही रक्कम महामंडळाला जुळवावी लागणार आहे.

महिन्याच्या ३० तारखेला मिळणार रक्कमउत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याला उशिराने होत आहे. याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये ओरड सुरू आहे. हा प्रश्न मिटविण्याच्या दृष्टीनेच राज्य सरकारने दरमहा सवलत मूल्याची रक्कम अदा करण्याचा मार्ग काढला असल्याचे सांगितले जाते. २२० कोटी रुपये सवलत मूल्यासोबतच अतिरिक्त १०० कोटी रुपयेसुद्धा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या ३० तारखेला ही रक्कम एसटी महामंडळाच्या खात्यात जमा करण्याची तरतूदही केली जाणार असल्याची माहिती आहे. 

कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित व्हावे यासाठी सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. महामंडळ अधिक सक्षम व्हावे याकरिता नवीन बसेसच्या दृष्टीने निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :state transportएसटी