शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

अकरावीसाठी ८८ हजार जागा

By admin | Published: August 06, 2016 1:22 AM

अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली

मुंबई : अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या किमान ८८ हजार जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.शुक्रवारपासून नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना केले होते. त्यानंतर ८ व ९ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरायचे आहेत. शिवाय अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालये निवडणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. याआधीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेप्रमाणे विशेष फेरीत महाविद्यालय निवड करताना क्षेत्र किंवा वॉर्डचे बंधन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या आवडत्या महाविद्यालयांची नावे देण्याची संधी मिळणार आहे. सहाव्या गुणवत्ता यादीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकूण ९७ हजार ६०९ जागा रिक्त होत्या. त्यात कला शाखेच्या १८,५३६ वाणिज्यच्या ५३,५१५ आणि विज्ञान शाखेच्या २५,५५८ रिक्त जागांचा समावेश होता. मात्र सहाव्या गुणवत्ता यादीत एकूण ९, ६४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांतील ९,६४५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान ८७,९६४ जागा रिक्त राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवाय १०० टक्के विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने रिक्त जागांचा आकडा ९० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्यांनो हे लक्षात ठेवाचदूरचे महाविद्यालय मिळालेले, शाखाबदल करायचा आहे, विषयबदल करायचा आहे, असे सर्व विद्यार्थी या विशेष फेरीसाठी अर्ज करू शकतात.विशेष फेरीसाठी नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे.शुक्रवारी, ५ आॅगस्टपासून नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार करण्यास सुरुवात झाली आहे.नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार केल्यानंतर प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.विशेष फेरीसाठी किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांची निवड करणे बंधनकारक आहे.महाविद्यालयांची निवड करताना संबंधित महाविद्यालयातील रिक्त जागा आणि कट आॅफ पाहूनच निवड करावी.कोणत्याही क्षेत्र किंवा वॉर्डमधील महाविद्यालय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे.याआधी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून घेतलेला प्रवेश विशेष फेरीसाठी अर्ज करताना रद्द करण्याची गरज नाही.>उपलब्ध जागांची संख्या शाखारिक्त जागाकला१८ हजार ५३६वाणिज्य५३ हजार ५१५विज्ञान२५ हजार ५५८एकूण९७ हजार ६०९

 

अर्धवट अर्ज भरल्याने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीसाठी एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळणार आहे.मात्र या विद्यार्थ्यांना शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि महानगर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शुक्रवारी महाविद्यालयापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते.