शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

विदर्भ-मराठवाड्यातील रस्ते व पुलांसाठी ८९० कोटी

By admin | Published: February 06, 2015 12:55 AM

विदर्भ-मराठवाड्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही विभागातील रस्ते व पुलांसाठी तब्बल ८९० कोटी रुपयांच्या

केंद्र शासनाकडून प्रस्ताव मंजूर : विकासाला चालना नागपूर : विदर्भ-मराठवाड्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही विभागातील रस्ते व पुलांसाठी तब्बल ८९० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना त्यांनी मंजुरी दिली आहे. यात तीन रेल्वे उड्डाणपूल व १० उड्डाणपुलांचा समावेश आहे. यामुळे या भागाच्या विकासाचा मार्ग आणखी सुकर होईल. केंद्रात प्रतिनिधित्व करताना गडकरी यांनी आपली कर्मभूमी असलेल्या विदर्भ-मराठवाड्याला झुकते माप दिले आहे. उमरेड तालुक्यातील सोनेगाव बेला सिर्र्सी रस्त्याची पुनर्बांधणी केली जाईल. यासाठी ७ कोटी ४३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मनसर-रामटेक-तुमसर रस्त्याची चार भागात दुरुस्ती केली जाईल. यासाठी तब्बल ३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. उमरेड-बुटीबोरी रोडची दुरुस्ती (३ कोटी), उमरेड तालुक्यातील बेला ठाणा रोड दुरुस्ती (१४.५० कोटी), भिवापूर जवळी नांद रोडची दुरुस्ती (३१.७० कोटी), पाचगाव-कुही-आंभोरा रस्त्याची दुरुस्ती (६० कोटी), खापा पारशिवनी आमडी रस्त्याची दुरुस्ती (७ कोटी), सावरगाव नरखेड मोवाड पुसला रस्त्याचे रुंदीकरण (२० कोटी), कारंजा भारसिंगी मोवाड विदर्भ-मराठवाड्यातीलभानगाव रस्ता रुंदीकरणासाठी (१९ कोटी), भिष्णूर खंडाळा सावरगाव पिपळा रस्त्याची दुरुस्ती (१० कोटी ३० लाख), नगरधन मानापूर रामटेक रस्त्याची दुरुस्ती (२.४९ कोटी), पारशिवनी खापरखेडा रस्त्याची दुरुस्ती (१३.५२ कोटी), परळी-धर्मापुरी रस्त्याची दुरुस्ती (१५.७५ कोटी), अंबेजोगाई-शिरसाळा- सोनपत रस्त्याची दुरुस्ती (२५.९० कोटी), बीड-परळी-गंगाखेड रस्त्याची दुरुस्ती (१६ कोटी), सावरगाव- अंबेजोगाई-अहमदनगर रस्त्यासाठी (१८ कोटी), मुंबई-कल्याण, नगर-बीड रस्त्याची दुरुस्ती (३४ कोटी), बीड जिल्ह्यातील घोगसपारगाव-भगवानघर रस्त्याची दुरुस्ती (७ कोटी), काडा-केरुल-किन्ही-बीड- सांगवी-चिखली रस्त्याची दुरुस्ती (१५ कोटी), यवतमाळ जिल्ह्यातील वणी-मुकुटबन-बोरी रस्त्याची दुरुस्ती (२० कोटी), चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-चंदनखेडा रोड (५ कोटी), राजुरा-आदिलाबाद रस्त्याची दुरुस्ती (१० कोटी), राजुरा-चक्कडकोट- वाकडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)