शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

९३ शाळांना ‘बांबूं’ची प्रतीक्षा

By admin | Published: November 13, 2016 10:08 PM

हक्काच्या शाळा खोल्या उपलब्ध व्हाव्या यासाठी सातपुड्यातील दुर्गम भागात बांबूपासून ९३ शाळा खोल्या तयार करण्याचा प्रयत्न फसला आहे.

ऑनलाइन लोकमत/मनोज शेलार,

नंदुरबार, दि. 13 - कुडाच्या घरात आणि भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या शाळांना हक्काच्या शाळा खोल्या उपलब्ध व्हाव्या यासाठी सातपुड्यातील दुर्गम भागात बांबूपासून ९३ शाळा खोल्या तयार करण्याचा प्रयत्न फसला आहे. तीन कोटी रुपयांचे अ‍ॅडव्हॉन्स पेमेंट देखील अडकले आहे. सातपुड्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य पोहचू शकत नाही अशा ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाने आठ ते दहा वर्षांपूर्वी फायबर शिटपासून व बांबूपासून शाळाखोल्या तयार करण्याचा निर्णय घेतला होता. फायबर शिटच्या शाळाखोल्या काही ठिकाणी बऱ्यापैकी उभ्या राहिल्या. परंतू बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या शाळा खोल्यांचा प्रयत्न पुरता फसला. शिवाय जिल्हा परिषदेचे तीन कोटी रुपये देखील ठेकेदाराकडेच अडकून पडले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने आता बांबू मिशनच्या शाळा खोल्यांचा नाद सोडला असून आता तीन कोटी रुपये कसे परत येतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.देशाच्या ईशान्यकडील राज्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी दळणवळणाची सुविधा नाही अशा ठिकाणी बांबूंपासून शाळा खोल्या तयार करण्यात येतात. त्यासाठी खास प्रकारचा बांबू हा केरळ राज्य व ईशान्यकडील आसाम, मणिपूर, त्रिपुरा या राज्यातून मिळतो. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गाव, पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाही अशा ९३ ठिकाणी बांबू खोल्या तयार करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने आठ ते दहा वर्षांपूर्वी घेतला होता.देशपातळीवर निविदा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने दोन वेळा देशपातळीवर निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दिल्लीच्या एका संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार काही भागात सर्व्हे देखील करण्यात आला. नंतर काम पुढे सरकलेच नाही. ठेकेदारास तीन कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हॉन्स पेमेंट चेक देखील देवून ठेवला. अ‍ॅडव्हॉन्स पेमेंट परत मिळत नसेल तर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी डीपीडीसीमध्ये दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबधित ठेकेदारावर कारवाई करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.>३२२ शाळा खोल्या भाड्याच्या घरात/झोपडीतजिल्ह्यातील दुर्गम भागासह सपाटीवरील भागात मिळून एकुण ३२२ शाळा खोल्यांची कमतरता आहे. जिल्हा परिषदेतर्फे त्या गाव, पाड्यात कुडाची झोपडी भाड्याने घेवून किंवा ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरविल्या जातात. सद्यस्थितीत अक्कलकुवा तालुक्यात ७६ तर धडगाव तालुक्यात १४१ ठिकाणी शाळाखोल्या नसल्याची स्थिती आहे. याशिवाय तळोदा तालुक्यात ५१, नंदुरबार तालुक्यात २४, शहादा तालुक्यात २० तर नवापूर तालुक्यात १० शाळाखोल्यांच्या बांधकामाची आवश्यकता आहे. आरोग्य केंद्राच्या इमारती या अनेक ठिकाणी फायबरशिटपासून तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळा व अंगणवाडींच्या इमारती देखील फायबरशिटपासून तयार कराव्या असा प्रस्ताव पुढे आला होता. परंतु अशा शाळा खोल्यांचा टिकावूपणा आणि त्याची उपयोगीता याबाबत सर्वेक्षण व अभ्यास न झाल्याने त्याला पुढे चालना मिळू शकली नाही.