शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

९५२ किलो कांद्याची पट्टी १ रुपया!

By admin | Published: May 23, 2016 1:58 AM

रात्रं-दिवस काबाडकष्ट करून काळ्या मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याची सध्या अवहेलना होताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला ९५२ किलो कांदा विकून फक्त १ रुपया हातात पडला आहे

पुणे / चाकण : रात्रं-दिवस काबाडकष्ट करून काळ्या मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याची सध्या अवहेलना होताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला ९५२ किलो कांदा विकून फक्त १ रुपया हातात पडला आहे. कांद्याची पट्टी पाहून हा बळीराजा कोसळून गेला असून, स्वत:च्या नशिबाला दोष देत आहे. आता शेतातील कांद्याला ‘कुणी भाव देता का भाव...’ असे म्हणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही. मारुती परभाणे असे या शेतकऱ्याचे नाव. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई या गावात त्यांची शेती आहे. त्यांनी चार एकर शेतात कांद्याची लागवड केली आहे. त्यापैकी १० गुंठा शेतातून त्यांनी विक्रीसाठी कांदा काढला. त्यांनी एका टेम्पोमधून दि.१० मे रोजी गुलटेकडी मार्केट यार्डातील पल्लवी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे कांदा विक्रीसाठी पाठविला होता.मध्यम प्रतीचा एकूण १८ गोणी कांदा होता. त्याचे एकूण वजन ९५२ किलो इतके भरले. या कांद्याला प्रति १० किलोस केवळ १६ रुपये भाव मिळाला. म्हणजेच प्रतिकिलोस १ रुपया ६० पैसे भावाने त्यांच्या कांद्याची विक्री झाली. या मालाची एकूण रक्कम १५२३ रुपये २० पैसे इतकी झाली. त्यामधून आडत ९१ रुपये ३५ पैसे, हमाली ५९ रुपये, भराई १८ रुपये ५५ पैसे, तोलाई ३३ रुपये ३० पैसे तर मोटारभाडे १३२० रुपये असा एकूण १५२२.२० रुपये पट्टीतून कपात करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती फक्त १ रुपया शिल्लक राहिला. परभाणे याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा किंवा इतर शेतमालाच्या विक्रीतून केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. कांद्याला या आठवड्यात ४०० ते ७०० रुपये असा प्रतवारीनुसार भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक किंचित वाढली. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक २ हजार २०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढून भाव स्थिर राहिले. कांद्याचा कमाल भाव ७०० रुपयांवर स्थिरावला. सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्याला प्रति १० किलोसाठी ५० ते ९० रुपये भाव आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही. ५० किलोची गोणी बाजारात पाठविण्यासाठी मोटारभाडे, आडत, हमाली, तोलाई आणि भराई या खचार्चा विचार करता किमान ८० ते ९० रुपये गोणीसाठी बाजारखर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० किलोच्या गोणीमागे १०० ते १५० रुपयेदेखील मिळत नाहीत. कांदा सुमार दर्जाचा असेल तर उत्पादन खर्चही निघत नसल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून सर्वत्रच कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पण सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथेकडे पाहायला वेळच नसल्याचे दिसते. (प्रतिनिधी)सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत नाही. परभाणे यांच्या कांद्याचा आकार लहान होता. त्यामुळे त्याला कमी भाव मिळाला. त्यांच्या गावापासून एका गोणीस ४० रुपये मोटार भाडे आहे. त्यानुसार १८ गोण्यांचे ७२० रुपये एवढेच भाडे होते. मात्र, हुंडेकरीने (मोटारचालक) पाठविलेल्या मेमोमध्ये अतिरिक्त ६०० रुपये लावण्यात आले आहेत. तसेच प्रत्यक्षात कांद्याला १५ रुपये प्रति दहा किलो असा भाव मिळाला होता. त्यामुळे त्यांची पट्टी येणे होत होती. हे पाहून १६ रुपये भाव करण्यात आला. - सुधीर जाधव, आडतदार