शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
3
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
5
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
7
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
8
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
9
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
10
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
12
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
13
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
15
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
16
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
17
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
18
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
20
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

शपथ घेऊन ९ दिवस उलटले, मंत्री खात्याविनाच; शिंदे गटाच्या दबावामुळे रखडले खातेवाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 5:22 AM

राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तारही लांबला

दीपक भातुसेमुंबई : राष्ट्रवादीत बंड करून तातडीने भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांचा शपथविधी मागील  रविवारी (२ जुलै) पार पडला. त्याला आता आठवडा उलटून गेला तरी खातेवाटप झाले नसल्याने हे मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणून काम करत आहेत. तसेच मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तारही लांबणीवर पडला आहे. 

वर्षभरापूर्वी शिंदे गट सरकारमध्ये सामील झाला तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासह  १० जणांंना मंत्रिपद मिळाले. शिंदे गटातील उर्वरित आमदार तेव्हापासून विस्ताराची प्रतीक्षा करत आहेत. काही आमदार उघडपणे आम्हाला मंत्री करण्याचे आश्वासन दिल्याचे वर्षभर सांगत फिरत आहेत. त्यातच  विस्तार झाला आणि अजित पवार गटाला संधी मिळाली, मात्र शिंदे गटाला स्थान मिळाले नाही. त्यामुळे जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊन शिंदे गटाच्या मंत्र्यांना संधी मिळत नाही तोपर्यंत अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाती देऊ नयेत, असा आग्रह शिंदे गटाने धरल्याने हे खातेवाटप रखडले असल्याचे बोलले जात आहे. 

अर्थखात्यावरून रस्सीखेच महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. शिवसेनेतून बाहेर पडताना अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी शिंदे गटाच्या आमदारांनी केल्या होत्या. त्यामुळे अजित पवारांना अर्थखाते देऊ नये असा शिंदे गटाचा आग्रह आहे.  दुसरीकडे अजित पवार यांच्याबरोबर आलेले छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांना महत्त्वाची खाती मिळावीत यासाठी अजित पवारांचा प्रयत्न आहे. या सर्व चढाओढीच्या राजकारणात मंत्र्यांचे खातेवाटप रखडलेले आहे. 

मंत्रालयाकडे पाठ खातेवाटप झाले नसल्याने हे ९ मंत्री मंत्रिमंडळ बैठकीचा अपवाद वगळला तर मंत्रालयाकडेही फिरकलेले नाहीत. या मंत्र्यांना दालनाचे वाटपही करण्यात आलेले नाही. त्यामुळे मंत्रालयात येऊन बसायचे कुठे हा प्रश्न नवनियुक्त मंत्र्यांसमोर आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस