ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघात मृत पावलेल्यांमध्ये 11 पैकी मुंबईतील मुलुंडमधील 9 जणांचा समावेश आहे. यामुळे मुलुंड परिसरात शोककळा पसरली आहे. सलग तीन दिवस सुटी असल्याने सर्वजण अक्कलकोटमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. मात्र प्रवासातच काळाने त्यांच्या घाला घातला. मृतांमध्ये मुलुंड पूर्वकडील नीता अपार्टमेंटमध्ये राहणा-या काळे दाम्पत्यासह सज्जन वाडी परिसरातील चव्हाण कुटुंबीयांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे - सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे मुंबईतील मुलुंडहून अक्कलकोटला जाणा-या ज्योती या खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. ही घटना पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावर रानडुक्कर ट्रॅव्हल्सच्या आडवं आल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात एकूण अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह एका लहान मुलीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची नावे
1) विजय काळे
2) ज्योती काळे
3) योगेश लोखंडे
4) जयवंत चव्हाण
5) योगिता चव्हाण
6) रेवती चव्हाण
7) जगदीश पंडित
8) शैलजा पंडित
9) प्रदीप अवचट
10) सुलभा अवचट