ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २९ - पुण्यातील बालेवाडी येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळून ९ मजून ठार झाले आहेत. दरम्यान
ढिगा-याखाली आणखी काही जण अडकल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरील स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळला. सकाळी १०.३०च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे काही कामगार ढिगा-याखाली अडकले तर काही १४ व्या मजल्यावरून खाली कोसळल्याने मृत्यूमुखी पडले.सदर इमारत प्राइड पर्पल बिल्डरची असल्याचे समजते
दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तेथे धाव घेत ढिगा-याखाली दबलेल्यांना बाहेर काझले व उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. मुख्य म्हणजे एवढी मोठी दुर्घटना होऊनही इमारतीचा बिल्डर वा प्रशासकीय अधिकारी अद्यापही घटनास्थळी न पोचल्याने संताप व्यक्त होत आहे.
सर्व मृतदेह ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
मृतांची नावे :
वसंत साहा, सर्वर साहा, मुन्ना पासवान, बिपीन ठाकूर, विजय पासवान, लखन साहा, करण सिंग, तुफान सिंग.