शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

अजित पवारांसोबत 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार; बैठकीला हे होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 2:02 PM

Ajit Pawar NCP News: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेतेपद नको तर प्रदेशाध्यक्ष पद द्या अशी मागणी केली होती.

भाजपा, शिवसेनेला कोंडी पकडण्यासाठी महाविकास आघाडीकडून एकत्र निवडणूक लढविण्याच्या मनसुब्यांना मोठा सुरुंग लागला आहे. राज्यात राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला असून अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर अजित पवार यांच्यासोबत असलेले ९ आमदारही मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेतेपद नको तर प्रदेशाध्यक्ष पद द्या अशी मागणी केली होती. यासाठी १ जुलैपर्यंतचा अल्टीमेटम दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. 

आज अजित पवार यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक झाली. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक  पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी आमदार उपस्थित होते. 

राष्ट्रलवादीच्या जवळपास तीस आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते आहे. राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ३० आमदार अजित पवारांच्या बाजुने आले आहेत. राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यासाठी शिंदे सरकारमधील मंत्री पोहोचू लागले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत पोहोचू लागले आहेत. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष