शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

झोपा काढणारे ९ जण निलंबित

By admin | Published: April 03, 2017 1:12 AM

बसच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी रात्रपाळीवर नियुक्त असलेले नऊ कर्मचारी झोपा काढताना आढळून आले

पुणे : बसच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी रात्रपाळीवर नियुक्त असलेले नऊ कर्मचारी झोपा काढताना आढळून आले आहेत. ही ‘डुलकी’ त्यांना चांगलीच महागात पडली असून, नऊही जणांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) निलंबित केले आहे. ‘पीएमपी’च्या कामामध्ये शिस्त आणण्यासाठी नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कामावर वेळेत न आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचे एकदिवसाचे वेतन न देण्याचा निर्णय घेतला. आता कामाच्या वेळी झोपा काढणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गात मुंढे यांच्या शिस्तीची जोरदार चर्चा सुरू आहे.रात्रीच्या वेळी आगारांमध्ये बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाते. मुंढे यांनी सर्व १३ आगारांमध्ये रात्रीच्या वेळी तपासणी करून कामाच्या वेळेत झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी चार कर्मचाऱ्यांचे पथकही नेमण्यात आले आहे. या पथकाने शनिवारी रात्री तपासणी केल्यानंतर, पुणे स्टेशन व कोथरूड आगारमध्ये नऊ कर्मचारी झोपलेले आढळले. त्यामध्ये वर्कशॉपमधील ७ कर्मचारी आणि २ बसचालकांचा समावेश आहे. त्यापैकी चार कोथरूड, तर पाच जण पुणे स्टेशन आगारातील आहेत. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)।कार्यालयातील चालक, वाहक रस्त्यावरचालक व वाहक म्हणून पीएमपीमध्ये रुजू झालेले ७१ जण मागील काही वर्षांपासून विविध आगारांसह मुख्य कार्यालयात प्रशासकीय काम करीत होते. त्या सर्वांना पुन्हा मार्गावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची नियुक्ती पुन्हा मूळ पदावर करण्यात आली असून, रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागातून न सोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.