बाभळगाव: "पंढरीची वारी आहे माझ्या घरी , आणिक न करी तीर्थ व्रत " या तुकोबांच्या अभंगाची प्रचिती सहज घ्यावी असे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील विनायराव नामदेवराव गिराम यांचे वारकरी घराणे. त्यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची परंपरा मागील तीन पिढ्यांनी सांभाळली आहे. तुकोबांच्या पालखीसोबत निघालेला या घराण्याचा देवाचा अश्व पालखीत सहभागी होत वाटेवरील सहा उभ्या आडव्या रिंगनात धाव घेत पांडुरंगाच्या पायथ्याशी पोहच करतो. 19 जून रोजी बाभळगाव येथून प्रस्थान झाल्यानंतर 9 जुले रोजी पंढरपूर येथे द्वादशीला अश्वाचे बाभळगावकडे प्रस्थान होते.
10 जून ला बाभळगाव येथून प्रस्थानतुकोबांच्या देहू येथील पालखीत सहभागी होण्यासाठी बाभळगाव येथील विनायकराव नारायणराव गिराम यांचा देव अश्व 10 जून रोजी बाभळगाव येथून प्रस्थान करण्यात आलe. 11 जून रोजी हा अश्व पंढरपूरला पोहचला, त्यानंतर 11 जून ते 19 जून या कालावधीथ 50 वारकऱ्यांसोबत पायी चालत देहूत त्याचे आगमन झाले. देहू येथून 20 जून पासून तुकोबांच्या निघालेल्या पालखीसोबत मुक्काम दर मुक्काम अश्व सहभागी झाला, या काळात रिगणात धावा घेतली.
परतीच्या प्रवासानंतर गावात मिरवणूक ...दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या अश्वाची परत आल्यानंतर बाभळगाव गावात मिरवणूक काढून श्रद्धा भावाने पूजा करतात आणि त्यानंतर रनेर कुटुंबाकडून अश्वाची वर्षभर देवा सारखी पूजा होते. कोरोणाच्या काळात दोन वर्षे पंढरपूरच्या आषाढी वारीला खंड पडला, वारकरी वारीसाठी आतुर झाले होते. या वर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने पुन्हा वारी उत्साहाने सुरू झाली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी दिंडीत 90 वर्षाची अखंड परंपरा असलेल्या पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील विनायकराव गिराम यांचा अश्व सहभागी झाला. 11 जूनला निघालेल्या या अश्वाने 20 जून रोजी देहू येथून तुकोबांच्या पालखी सोबत 19 जुले रोजी शनिवारी आशाडी एकादशी च्या एक दिवस अगोदर अश्वाने पाखली विठू रायच्या पायथ्याशी आणून सोडली.
देहू - आळंदीहून पांडुरंगाच्या ओढीने निघालेला वारकरी जेव्हा चालून चालून थकतो तेव्हा त्याच्यात उत्साह निर्माण करणारा प्रसंग म्हणजे 'रिंगण'. या रिंगण सोहळ्यात तो मुक्तपणे टाळ मृदंगाच्या ठेक्यात नाचतो, गातो, खेळतो. वारकरी संप्रदयायील ही अखंड परंपरा आजही कायम आहे., याच पालखीसोबत बाभळगावंचा अश्व वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. दोन वर्षांच्या कोरिणच्या पार्श्वभूमीवर वर वारी बंद असल्याने अश्वाची वारी ही चुकली होती. पण, यावर्षी पुन्हा वारी सोहळ्यात अश्व सहभागी झाला होता.