श्रीकांत बाविस्कर - नातेपुते
(जि. सोलापूर)
आजर्पयत नदी, ओढे, कालव्यावर पूल बांधलेले ऐकले व पाहिले असेल; मात्र 6क् फुटांवर उंच कालवा, त्याखालीच रस्ता असा पूल कधी पाहिला आहे का..? ही कल्पना नाही तर वास्तव आहे. नातेपुतेजवळ कालवा बांधला असून, त्या खाली नऊ मोरी असलेला हा पूल बांधला आहे. या पुलाने या वर्षी नव्वदी पूर्ण केली आहे. तरीही या पुलाला ना किरकोळ भेगा ना पुलावरून दहा महिने वाहणा:या कालव्यातून पाणी ङिारपते..
वीर धरणापासून माळशिरस-सांगोला मार्गे पंढरपुरातील भीमेर्पयत अनेक गावांतील तहान भागविण्यासाठी नीरा नदीवर कालवा बांधण्यात आला. मात्र नातेपुतेजवळ मध्येच मोठा ओढा आडवा आल्याने हा कालवाच ओढय़ापासून सुमारे 6क् फूट उंचावर बांधला गेला.
मात्र इतक्या उंचीवरचा हा कालवा मजबूत आणि दीर्घायुषी व्हावा यासाठी 1925 साली ब्रिटिशांनी पहिल्यांदा ओढय़ावर नऊ मोठे पिलर्स उभे करून पूल तयार केला आणि त्यावर हा कालवा बांधला. या अद्भुत स्थापत्याच्या नमुन्याला यंदा 9क् वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही या दहा फुटी पुलावरून छोटी चारचाकी वाहनेही सररास जात आहेत.
प्रथम दगडी पुलाचे बांधकाम करताना त्या दगडाचा आकार किती आहे त्यावरून तो दगड या बांधकामासाठी वापरला जावा की नाही हे ठरवले गेले. दगड ठरवतानाही तो उच्च प्रतीचा घेऊन त्या दगडाचा विटेसारखा वापर करण्यात येई.
पुलासाठी वापरण्यात येणा:या चुन्याच्या मळणीसाठी बैलांचे घाणो तयार करून त्यात ते एकजीव केले जायच़े या पुलाचे बांधकाम करीत असताना दगडाचा आकार, लांबी, रुंदी समान करून गुनाई, घडई करून मगच चुन्यामध्ये बसवत असत.
प्रत्येक दोन फुटांच्या उंचीवर बांधकाम मजबूत व्हावे यासाठी हेदर म्हणजे सुळकी दगड बसवला
जात असे. नऊ मोरी पुलाचे बांधकाम नऊ आर्च पिलरमध्ये आहे. मोरीमधील जी भिंत आहे ती बटर पद्धतीच्या बांधकामाची आहे. पुलाच्या
वरचा गिलावा कमानीप्रमाणो टाकला आहे. गिलावा ओतताना चुना,
शिसे, वाळू, दगड यांचा वापर केला आहे.