मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल ९४ बळी गेले आहेत. तर राज्यात १० एप्रिलपर्यंत १ हजार २३६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. याखेरीज, राज्यात सर्वाधिक मृत्यू नाशिकमध्ये झाले असून त्याची संख्या २१ आहे. तर आठ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून रुग्णालयात आॅसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण १४ हजार १३३ एवढे आहेत.
राज्यात नाशिकच्या खालोखाल नागपूरमध्ये आणि अहमदनगरमध्ये स्वाइन फ्लूने झालेल्या मृत्यूची संख्या अधिक आहे. तर राज्यभरात शासकीय रुग्णालयांमध्ये २४७ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूचा विषाणू हा अतिसूक्ष्मजीव प्रकार आहे. हा विषाणू श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. यातून श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात.
स्वाइनचा प्रादुर्भाव रोखण्यास आरोग्य विभागाद्वारे सतर्कता बाळगली जात असून प्रतिबंध व नियंत्रणास सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे आयसीयू व व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.जिल्हा/मनपा मृत्यूनाशिक २१नागपूर १६अहमदनगर १२पुणे मनपा ८कोल्हापूर ५पुणे ग्रामीण, अमरावती प्रत्येकी ४मुंबई मनपा, जळगाव प्रत्येकी ३औरंगाबाद, सातारा, कल्याणपिंपरी, चिंचवड मनपा प्रत्येकी २सिंधुदुर्ग, भंडारा, सोलापूर,वसई-विरार, पालघर, बीड, धुळेचंद्रपूर मनपा, ठाणे, यवतमाळ प्रत्येकी १