मुंबई : राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या भागीदारीतून स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात नऊ रेल्वेमार्ग पूर्ण करण्यात येणार आहेत. या महामंडळाच्या भागभांडवलापोटी ५० कोटी रुपये राज्य शासनाने नुकतेच दिले आहेत. ८ जानेवारी २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यात मुंबईत बैठक होऊन एमआरआयडीसी स्थापन करण्याचे निश्चित झाले होते. २८ जून २०१५ रोजी त्यासंदर्भात सामंजस्य करारदेखील झाला होता. गेल्या महिन्यात एमआरआयडीसी स्थापन करण्यास प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली होती. (विशेष प्रतिनिधी) हे आहेत आठ रेल्वेमार्ग १) अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, २) वर्धा-यवतमाळ-नांदेड, ३) वडसा-गडचिरोली, ४) पुणे-नाशिक, ५) मनमाड-इंदूर, ६) नागपूर-नागभीड ब्रॉडगेज करणे, ७) गडचांदूर-आदिलाबाद, ८) लोणंद-फलटण-बारामती, ९) कोल्हापूर-वैभववाडी.
लोहमार्ग महामंडळ पूर्ण करणार नऊ रेल्वेमार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 5:06 AM