मुंबई : राज्यातील गरिब, कष्टकरी, कामगार, श्रमिक यांच्या घामाला, श्रमला, दैवतांना आणि त्याच्या भाकरीला मोल देणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. त्याबद्दल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
याचबरोबर, राज्यातील जनतेला जो जे वांच्छिल ते ते देणारा हा अर्थसंकल्प असून विकासाची यात्रा, गावातील जत्रा आणि वारकऱ्यांची दिंडी या सगळ्यांसोबत चालणारा हा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जो नारा दिला आहे त्यानुसारच "सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास" या दिशेने भविष्यात महाराष्ट्राला उभे करणारा आजचा अर्थसंकल्प आहे, असे आशिष शेलार म्हणाले.
याशिवाय, गेल्या अडीच वर्षांचा अंध:कार, नैराश्य, सततचे रडगाणे हे सारे दूर करुन आधुनिक महाराष्ट्राला प्रकाशाकडे नेणारा आशावादाचे नवनवीन संकल्प असलेला हा अर्थसंकल्प आहे, अशीही प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.