मुंबई : आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी वेळापत्रकानुसार शुक्रवारी असताना यात बदल करण्यात आला आहे. ही सुनावणी आता एक दिवस आधीच म्हणजे गुरुवारी पार पडणार आहे. कार्यक्रमानिमित्त दिल्लीला जावे लागणार असल्याने हा निर्णय घेतल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
नार्वेकर म्हणाले, मला दिल्लीतील कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी १३ तारखेची सुनावणी १२ तारखेला घेत आहे. मला यात कोणतीही दिरंगाई करायची नाहीये. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी एक दिवस आधी सुनावणी घेत आहे.