राज्य सरकारला २५ हजारांचा दंड; चंद्रकांत पाटील आक्षेपार्ह विधानावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:26 AM2023-02-28T07:26:03+5:302023-02-28T07:26:32+5:30
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कुदळे यांच्यावरील गुन्हा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. तसेच संदीप यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी संदीप यांनी त्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकली. पोलिसांनी त्यांना ११ डिसेंबर २०२२ रोजी अटक केली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने कुदळेंवरील गुन्हा रद्द केला.