शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 6:12 AM

Maharashtra Assembly Election update: दोन दिवस मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाचे पथक मुंबईत होते. यादरम्यान राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी भेटी घेऊन विविध सूचना आणि हरकती नोंदवल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार, ही निवडणूक पुढे ढकलली जाणार का? अशा चर्चा सुरू असतानाच राज्यात २६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल, असे सांगत विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दिले.

दोन दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे, त्यापूर्वी निवडणूक होईल. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे. मात्र, निवडणूक किती टप्प्यात होईल, हे लवकरच सांगू, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

दोन दिवस मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाचे पथक मुंबईत होते. यादरम्यान राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी भेटी घेऊन विविध सूचना आणि हरकती नोंदवल्या आहेत. यामध्ये राजकीय पक्षांकडून खर्चाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात, तसेच काही वस्तूंचे दर कमी करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. मात्र, खर्चाची मर्यादा ही देशपातळीवर एकच ठरवण्यात आलेली असते, तसेच वस्तूंचे दरही महागाई निर्देशांकानुसारच ठरवलेले असतात. त्यामुळे त्यात कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद  पवार गटाच्या मागणीवर नो कमेंटकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुक्त चिन्हातून तुतारी चिन्हाशी साधर्म्य असलेले पिपाणी हे चिन्ह वगळण्याची मागणी शरद पवार गटाने आयोगाकडे केली आहे.चिन्हाबाबत आदेश आम्ही दिला आहे. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे मी यावर बोलणार नाही, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.आदिवासींची नोंदणी आदिवासींच्या दुर्लक्षित जमातींच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. राज्यात कातकरी, कोलम आणि मारिया गोंड या तीन आदिवासी जमाती आहेत.यावेळी त्यांची घरोघरी जाऊन १०० टक्के मतदार नोंदणी करण्यात आली आहे. पुण्यातील खडकवासला येथे केवळ २०० कातकरी मतदार असलेले मतदान केंद्र असणार आहे.

शंभरीपार किती मतदार? एकूण मतदार    ९.५९ कोटी पुरुष    ४.९५ कोटीमहिला    ४.६४ कोटीतृतीय पंथी    ५९९७  अपंग    ६.३२ लाख  ८५ वर्षांवरील    १२.४८ लाख१०० वर्षांवरील    ४९,०३४  सेवा मतदार    १.१६ लाखपहिल्यांदा (१८ते १९ वर्ष) - १९.४८ लाख

मतदारसंघ स्थिती एसटी    २५ एससी    २९ जनरल    २३४१००० मतदारांमध्ये किती महिला    वर्ष    प्रमाण    २०१९    ९१४  २०२४    ९३६यावेळी २२ ने झाली वाढ 

राज्यातील मतदान केंद्र    शहरी    ४२,५८५    ग्रामीण    ५७,६०१    एकूण    १ लाख १८६  n५०,०९३ (५० टक्के) केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे देखरेख  nप्रत्येक केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतीलn२९९ केंद्रावर दिव्यांग कर्मचारी असतील तैनात  n३५० केंद्रे ही नव्याने शासकीय सेवेत आलेले कर्मचारी सांभाळतीलn३८८ केंद्र महिला सांभाळतील. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग