शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाने समोर येऊन केला गौप्यस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:11 PM

समित कदम यांच्या या दाव्यामुळे आता अनिल देशमुख यांची अडचण झाली असून ते याबाबत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री असा राजकीय सामना मागील काही दिवसांपासून रंगत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करण्यासाठी फडणवीस यांनी माझ्याकडे एका व्यक्तीला पाठवून दबाव टाकला होता, असा खळबळजनक दावा देशमुख यांनी केला. मात्र मी असा कोणताही दबाव आणला नसल्याचं प्रत्युत्तर फडणवीस यांच्याकडून देण्यात आलं. दरम्यान, ज्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी फडणवीसांकडून पाठवण्यात आल्याचा दावा अनिल देशमुखांकडून केला जात आहे, त्याच समित कदम यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे.

"महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. गृहमंत्र्याला कडक सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे देशमुख यांच्या इच्छेशिवाय मी त्यांना भेटणं शक्यच नव्हतं. अनिल देशमुख यांनीच मला बोलावून घेतलं होतं. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून माझ्या काही अडचणी कमी होऊ शकतात, हे बघण्याची विनंती मला देशमुख यांनी केली होती," असा दावा समित कदम यांनी केला आहे.

दरम्यान, समित कदम यांच्या या दाव्यामुळे आता अनिल देशमुख यांची अडचण झाली असून ते याबाबत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देशमुखांनी फडणवीसांना काय चॅलेंज दिलंय?

देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केल्यानंतर  देशमुख यांनीही प्रसारमाध्यमांसमोर येत फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं. "देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात आरोप करून प्रतिज्ञापत्र देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. याबाबत मी काल वक्तव्य केलं होतं. मी पुराव्याशिवाय कोणतंही वक्तव्य करत नाही. मी जे काही बोललो, फडणवीसांवर आरोप केले, त्याबाबतचे माझ्याकडे पेन ड्राइव्हमध्ये पुरावे आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना काल माझ्यावर जो आरोप केला आणि सांगितले की मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलल्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत. माझं फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी ते व्हिडिओ सार्वजनिक करावेत. फडणवीस यांच्याकडे माझे कोणतेही व्हिडिओ नाहीत, फक्त काहीतरी आरोप करायचे म्हणून ते तसे बोलले आहेत. मात्र माझ्यावर वेळ आल्यानंतर किंवा कोणी मला चॅलेंज केल्यानंतर मी पेन ड्राइव्हमधील पुरावे सर्वांसमोर आणणार आहे," अशा शब्दांत देशमुख यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा