शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा डाव, पश्चिम घाट वाचवण्यासाठी पुढे या राव

By संदीप आडनाईक | Published: July 28, 2022 3:52 PM

पूर्वी ९७ टक्के जैवविविधता असलेले हे क्षेत्र राजकारण्यांमुळे विकासकामासाठी उपयोगात आणून ही टक्केवारी ३७ वर आली आहे. आता हेही क्षेत्र कमी करण्याचा डाव सुरू आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रांबाबत केंद्र सरकारने सुधारित अधिसूचना काढली असून, तज्ज्ञ समितीच्या शिफारशींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. यात सरकारने नव्याने निश्चित केलेल्या पाच राज्यांतील संवेदनशील क्षेत्र कमी करण्यासाठी राजकारणी सरसावले असून, त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी अवघ्या साठ दिवसांचाच अवधी मिळाला आहे. हे क्षेत्र वाचविण्यासाठी वनस्पती व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी अभ्यासक, विषयतज्ज्ञ, पर्यावरणप्रेेमी यांना योग्य सूचना केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आवाहन केले आहे.सहा राज्यांत विस्तारलेला पश्चिम घाट जैवविविधतेने समृध्द आणि मुळातच पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र आहे. पूर्वी ९७ टक्के जैवविविधता असलेले हे क्षेत्र राजकारण्यांमुळे विकासकामासाठी उपयोगात आणून ही टक्केवारी ३७ वर आली आहे. आता हेही क्षेत्र कमी करण्याचा डाव सुरू आहे. केरळने यात बाजी मारली असून, महाराष्ट्रही अंशत: यशस्वी झाला आहे. कर्नाटकही चार हजार क्षेत्र वगळावे म्हणून आग्रह धरत आहे.

याबाबतची सुधारित अधिसूचना केंद्र सरकारने ६ जुलै २०२२ रोजी काढली आहे. गॅझेट ऑफ इंडियामध्ये केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने सर्वांसाठी हिंदी व इंग्रजीतून ही नवी अधिसूचना प्रकाशित केली आहे. याबाबतची मते, टीका टिप्पणी, संदेश व सूचना मागविल्या आहेत. ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून ६० दिवसांचा अल्प कालावधी दिला आहे. याबाबत अभ्यासक, विषयतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमींनी आपली आवश्यक मते, सूचना पत्राद्वारे, सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ एनव्हारमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, इंडिया पर्यावरण भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, जोरबाघ रोड, अलिगंज, न्यू दिल्ली, ११००३३ या पत्त्यावर किंवा संकेतस्थळावरच्या ई-मेलद्वारे पाठवण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत पश्चिम घाटातील खाणकामे, उत्खनन, वृक्षताेड, जंगलाचा विनाश, अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे, रस्ते विकास प्रकल्प, चाेरट्या शिकारी व तस्करी आणि अनियंत्रित पर्यटनामुळे पश्चिम घाटाचे आणि तेथील वन्यजीवांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. पश्चिम घाटात आज अवघे ३७ टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. यामुळेच तेथील पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षण-संवर्धनासाठी पश्चिम घाट परिसरात संवेदनशील क्षेत्राची निर्मिती करणे अत्यावश्यक असल्याने, केंद्र शासनाच्या सुधारित अधिसूचनेस पाठिंबा द्यावा आणि आवश्यक सूचना वेळेत मंत्रालयास पाठवाव्यात. -डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पती व पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरणCentral Governmentकेंद्र सरकार