शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
6
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
7
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
10
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
11
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
12
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
14
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
15
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
16
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
17
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
19
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
20
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार

राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 6:55 AM

मराठा समाजाचे राजकीय वर्चस्व आहे, ही बाब शुक्रे आयोगाने मान्य केली आहे आणि त्याआधीच्या आयोगांनीही मान्य केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राजकीय वर्चस्व असलेला समाज सामाजिकदृष्ट्या मागास ठरू शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने जाट समाजाला आरक्षण नाकारताना दिला आहे. मात्र, या निकालाच्या विरोधी भूमिका शुक्रे आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करताना घेतली आहे, असा युक्तिवाद मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकाकर्त्यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केला. पुढील सुनावणी ११ ऑक्टोबरला होणार आहे. 

मराठा समाजाचे राजकीय वर्चस्व आहे, ही बाब शुक्रे आयोगाने मान्य केली आहे आणि त्याआधीच्या आयोगांनीही मान्य केली आहे. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने जाट समाजाला आरक्षण नाकारताना राजकीय वर्चस्व असलेला समाज सामाजिकदृष्ट्या मागास ठरू शकत नाही, असा स्पष्ट निकाल दिला आहे. तरीही शुक्रे आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात जात मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर व ॲड. अथर्व दाते यांनी न्यायालयात केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठापुढे सुरू होती. शुक्रे आयोगाने चुकीचे निकष लावून मराठा समाजाला आरक्षण दिले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणताना अंतुरकर यांनी युक्तिवाद केला की, मराठा समाजाला आरक्षण देताना ते आर्थिकदृष्ट्या मागास ठरविण्यात आले आहे. मात्र, हे मागासलेपण सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे आले आहे की नाही, हे आयोगाने तपासले नाही. आर्थिक मागासलेपण हे अन्य बाबींमुळेही येऊ शकते. त्यामुळे हा निकष मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी योग्य नाही. मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी शुक्रे आयोगाने जे निकष लावले आहेत ते अयोग्य आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणCourtन्यायालय