मुंबई : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात मागील अधिवेशनात अविश्वासाची नोटीस देणारे आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर विश्वासदर्शक ठराव शुक्रवारी विधान परिषदेत मांडला. भाई गिरकर यांनी त्याला अनुमोदन देत हा ठराव बहुमताने मान्य करण्यात आला.सत्ताधारी पक्षाकडून हा विश्वासदर्शक ठराव अचानक मांडण्यात आला. यामुळे विरोधकांची पंचाईत झाली. अनिल परब बोलायला उभे राहण्याआधीच तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी हा ठराव बहुमताने मंजूर करीत दुपारचे कामकाज स्थगित केले. यामुळे संध्याकाळी पुन्हा एकदा परब यांनी हा मुद्दा मांडत ठरावाआधीच आम्ही अपात्रतेची नोटीस दिल्याने विश्वासदर्शक ठराव होऊ शकत नसल्याचे सांगितले. प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे वर्षभर उपसभापतीं विरोधात अविश्वास ठराव दाखल करता येत नाही, असे मंत्री पाटील म्हणाले.
गोऱ्हे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 11:24 AM