शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आधार फेल : ड्रेससाठी १२ लाख मुले अपात्र,५ लाख विद्यार्थ्यांना आधारच नाही, निधीला कात्री लागणार

By अविनाश साबापुरे | Published: April 01, 2024 9:42 AM

Students In Maharashtra: राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

- अविनाश साबापुरे यवतमाळ : राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले. १२ लाख ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड झाले आहे. गंभीर म्हणजे, ५ लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही.

त्यामुळे नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागून त्यांना या दोन्ही लाभांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राची किमान ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारची वैधता ३० मार्चपर्यंत यूडायसवर पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या होत्या. त्यात केवळ १२ जिल्ह्यांनी बाजी मारली. उर्वरित जिल्ह्यांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पुरविल्यानंतर ज्यांचे व्हॅलिडेशन प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यांची संख्याही ३२,०९५ आहे. त्यामुळे लवकरच जे जिल्हे ९५ टक्के कामगिरीच्या आसपास पोहोचले आहेत, ते हा टप्पा ओलांडणार आहेत. त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळते की नाही, हा प्रश्नच आहे. 

अभिनंदनाचे पत्र आले का? - आधार क्रमांकाचे ९५ टक्केपेक्षा अधिक काम मुदतीत पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने अभिनंदन पत्र पाठविले आहे. - यवतमाळ (९५.२५), सिंधुदुर्ग (९९.२४), कोल्हापूर (९७.८९), गडचिरोली (९७.४०), सांगली (९७.२९), भंडारा (९६.४७), गोंदिया (९६.३५), रत्नागिरी (९६.३१), अहमदनगर (९६.२५), चंद्रपूर (९५.६६), बुलढाणा (९५.२७) आणि सातारा (९५.२३) या १२ जिल्हा परिषदांचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी कौतुक केले.

तुमच्या जिल्ह्यात किती जणांचे आधारकार्ड ठरले इनव्हॅलिड?   जिल्हा    आधार फेलसिंधुदुर्ग    ६२२ कोल्हापूर     ७,९५९ गडचिरोली     ३,१४९ सांगली    ६,९५१ भंडारा    ६,७५८ गोंदिया    ६,९७० रत्नागिरी     ७,४५७ अ.नगर     २५,०६३ चंद्रपूर    १२,०९२ बुलढाणा     १६,४९३ यवतमाळ     १३,५४० सातारा    १६,४९९ परभणी    ११,३९७ हिंगोली    ७,०६० अमरावती    १५,०४७ वर्धा    १०,४८३ लातूर    १७,७९५ पुणे    ६५,९९५ वाशिम    ९,४६५ नाशिक    ५५,०१७ जळगाव    ३९,५८६ अकोला    १५,३३३ नागपूर    ४७,४९३ धाराशिव    १८,०६१ धुळे    २८,१२९ सोलापूर    ५८,८०३ नंदूरबार    २१,७७४ बीड     ३९,९८५ जालना    ३०,८४८ नांदेड    ५३,७५३ रायगड    ४०,९७१ मुंबई     १,०३,७५४ मुंबई उप.    ३८,०९१ छ. संभाजीनगर ९५,५३२ ठाणे    १,८५,२४० पालघर     १,०३,३१९एकूण    १२,३६,४८४  

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र