यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्म का वाटले? अजित पवार म्हणाले, "मूहुर्त असल्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:20 PM2024-10-22T13:20:01+5:302024-10-22T13:21:27+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सोमवारी १८ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे.

AB form was given to the candidates as it was their mohurta Explanation by Ajit Pawar | यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्म का वाटले? अजित पवार म्हणाले, "मूहुर्त असल्याने..."

यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्म का वाटले? अजित पवार म्हणाले, "मूहुर्त असल्याने..."

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्याप जागावाटपावर अद्यापही चर्चा आणि बैठका सुरु आहेत. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाकडून सोमवारी १८ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी घोषित होण्याआधीच अजित पवार यांनी १८ जणांना एबी फॉर्मचे वाटप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आता माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही उमेदवारांना सोमवारी एबी फॉर्मचे वाटप करण्यात आलं. काही जागा या फायनल असून काहींचे मुहूर्त असल्याने त्यांना एबी फॉर्म दिल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर महायुतीमध्ये मागे राहिलेल्या जागांवर आज निर्णय होणार असल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान, रात्री वर्षा बंगल्यावर झालेली बैठक शिवसेना आणि भाजपच्या जागांबाबत असल्यामुळे गैरहजर होतो असेही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.

"काहींच्या याद्या फायनल झालेल्या आहेत. काही जागा महायुतीमध्ये फायनल करण्यात आल्या आहेत. काहींचे मूहुर्त होते म्हणून त्यांना एबी फॉर्म दिले. काही जागा चर्चेत मागे राहिल्या आहेत त्यांचा आज निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत," असं अजित पवार यांनी म्हटलं. 

यावेळी अजित पवार यांना वर्षा बंगल्यावरील बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. "जर काही जागांबाबत शिवसेना आणि भाजपसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घ्यायचा असेल तर मी त्यामध्ये असायचे कारण काय आहे. ज्यावेळी तिघांशी संबधित चर्चा असते त्यावेळी तिघे असतात. यातून वेगळा अर्थ काढायचं कारण नाही," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
 
कोणत्या उमेदवारांना एबी फॉर्म?

संजय बनसोडे - उदगीर

चेतन तुपे - हडपसर

सुनील टिंगरे - वडगाव शेरी

दिलीप वळसे पाटील - आंबेगाव

दौलत दरोडा - शहापूर

राजेश पाटील - चंदगड

दत्तात्रय भरणे - इंदापूर

आशुतोष काळे - कोपरगाव

हिरामण खोसकर - इगतपुरी

नरहरी झिरवळ - दिंडोरी

छगन भुजबळ - येवला

भरत गावीत - नंदुरबार

बाबासाहेब पाटील- अहमदपूर

नितीन पवार - कळवण

इंद्रनील नाईक- पुसद

अतुल बेनके - जुन्नर

बाळासाहेब अजबे- आष्टी

यशवंत माने - मोहोळ

Web Title: AB form was given to the candidates as it was their mohurta Explanation by Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.