मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने तब्बल २१ दिवस परळीमध्ये केलेले क्रांतिकारी ठिय्या आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक आबासाहेब पाटील यांचा या ठिय्या आंदोलनात सिंहाचा वाटा होता. गुरुवारी मराठा आरक्षण वैध असल्याचा न्यायालयाने निकाल देताच आबासाहेब यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले. एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात यावेळी ते आपली प्रतिकिया देत होते.
मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने परळी येथे २१ दिवस केलेल्या ठिय्या आंदोलनाची राज्यभरात चर्चा झाली होती. यावेळी २६ पेक्षा अधिक जिल्ह्यातील समन्वयकांनी या ठीय्यात हजेरी लावली होती. या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व पुण्याचे आबासाहेब पाटील यांच्याकडे होते. गुरुवारी न्यायालयाने मराठा आरक्षण वैध असल्याच्या निकाल दिल्यांनतर आबासाहेब पाटील यांना आपले अश्रू थांबवता आले नाहीत आणि एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात प्रतिकिया देताना ते ढसाढसा रडले. त्यांच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारे होते.
खूप सकारात्मक निर्णय झाला आहे. मराठा समाजाला खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि त्यांनतर हा निकाल आला आहे. मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करतो. ३२ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर मराठा समाजाला न्याय मिळाले आहे, असल्याचे पाटील म्हणाले. ४२ मराठा बांधवांच्या बलिदान आणि हजारो तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले असल्याचे ही पाटील म्हणाले.