मुंबई : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक, उच्चदाब व अतिउच्चदाब वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांना व्याज, दंड व विलंब आकारणीबाबत माफी मिळणार असून, ही योजना ३० एप्रिल २०१७पर्यंत लागू राहील.कायमस्वरूपी वीज खंडित असलेले ग्राहक त्यांच्याकडील मूळ थकबाकीचा शंभर टक्के भरणा करतील; त्यांना शंभर टक्के व्याज व दंड आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. तसेच मूळ रकमेत पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारी २०१७पूर्वी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकारणी माफ होणार आहे. १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकीत मूळ रक्कम भरल्यानंतर १०० टक्के विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. शिवाय ७५ टक्के व्याजात सूट देण्यात येणार आहे. योजनेतून थकबाकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित वीजजोडणी देण्यात येईल. अभय योजना कृषिपंपधारक शेतकरी व पाणीपुरवठा योजनेच्या थकबाकीदारांना लागू नाही. योजनेत लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. (प्रतिनिधी)
वीज ग्राहकांसाठी अभय योजना
By admin | Published: November 12, 2016 4:08 AM