मुंबई : आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन्स अर्थात ‘एबीसी’च्या अध्यक्षपदी ‘ईनाडू’चे संचालक आय. व्यंकट तर उपाध्यक्षपदी कोका-कोला इंडियाचे देबब्रत मुखर्जी यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड २०१६-१७ या वर्षासाठी आहे.व्यंकट हे मीडिया रिसर्च युजर्स कौन्सिल (एमआरयूसी) चेही अध्यक्ष असून त्यांनी अॅडव्हर्टायजिंग स्टॅन्डडर््स कौन्सिल आॅफ इंडिया (एएससीआय) चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच, एमआरयूसी आणि इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (आयबीएफ) चे ते संस्थापक सदस्य, आयबीएफ, इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशन (आयएनएमए), ब्रॉडकास्ट आॅडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) या मानाच्या संघटनांच्या कार्यकारी मंडळांवर त्यांचा समावेश आहे. त्यांनी इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस)च्या कार्यकारी मंडळावरही बराच काळ काम पाहिले. तर एबीसीच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले मुखर्जी हे कोका-कोला इंडिया प्रा. लि.च्या मार्केटिंग आणि व्यापार विभागाचे उपाध्यक्ष आहेत. प्रकाशकांचे प्रतिनिधी विभागात लोकमत मीडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची एबीसीच्या व्यवस्थापन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. या विभागात निवड झालेल्या इतर सदस्यांमध्ये यशोदया एंटरप्रायझेस प्रा. लि.चे आय. व्यंकट, जागरण प्रकाशन लि. चे शैलेश गुप्ता, द बॉम्बे समाचार प्रा. लि.चे होर्मुसजी एन. कामा, एचटी मीडिया लि.चे बेनॉय रॉयचौधरी, एबीपी प्रा. लि.चे चंदन मुजुमदार, बेनेट कोलमन अँड कं.लि.चे राजकुमार जैन, सकाळ पेपर्स प्रा. लि.चे प्रताप जी. पवार यांचाही समावेश आहे. जाहिरात प्रतिनिधी विभागात कोका-कोला इंडिया प्रा. लि.चे देबब्रत मुखर्जी, आयटीसी लि.चे हेमंत मलिक, फ्युचर रिटेल लि.चे संदीप तरकस, टाटा मोटर्स लि.चे मयांक पारिख यांचा समावेश आहे. जाहिरात एजन्सींचे प्रतिनिधी विभागात डीडीबी मुद्रा प्रा. लि.चे मधुकर कामथ, आयपीजी मीडिया ब्रॅण्ड्स इंडियाचे शशिधर सिन्हा, आरके स्वामी बीबीडीओ प्रा. लि.चे श्रीनिवासन के. स्वामी, ग्रुप ए मीडिया इंडिया प्रा. लि.चे सीव्हीएल श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर महासचिव म्हणून होर्मुझद मसानी यांची निवड झाली आहे.
‘एबीसी’च्या अध्यक्षपदी व्यंकट बिनविरोध
By admin | Published: September 24, 2016 3:57 AM