लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : घरदुरुस्तीच्या वादातून ठाकुर्लीतील बालाजीनगर येथे झालेल्या कंत्राटदार किशोर चौधरी हत्या प्रकरणानंतर बेपत्ता झालेल्या महिमादास विल्सन (१९) याचे अपहरण करून त्याला महाबळेश्वर-वाईच्या दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपी भोईर चौकडीने दिली आहे. त्यामुळे पोलिसांची चांगलीच झोप उडाली आहे. पोलिसांनी गिर्यारोहकांच्या मदतीने युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महिमादास हा या प्रकरणातील साक्षीदार असल्यानेच त्याचे अपहरण केल्याची चर्चा ठाकुर्ली परिसरात सुरू आहे.किशोर चौधरी यांची मंगळवारी हत्या झाली होती. भोईर यांनी चौधरी यांच्यावर २१ गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी १२ त्यांना लागल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला होता. तर चौधरी यांच्यासमवेत असलेले नितीन जोशी हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दिलीप, शंकर, सुरज आणि सागर भोईर यांना कोळेगावातून अटक केली. तर, त्यांचे साथीदार कुणाल आणि परेश आंधळे यांना मालेगावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले.महिमादास हा मंगळवारी १०.३० वाजता किशोर यांच्याकडे गेला होता. चौधरी यांच्या हत्येनंतर तो बेपत्ता आहे. त्याचा मोबाइलही बंद आहे. त्याच्या डाव्या खांद्याला एक गोळी लागली आहे. आरोपींनी त्याला एका गाडीतून पळवून नेले, असा आरोप त्याची आई अॅन्थनी अम्मा यांनी बुधवारी पत्रकारांसमोर केला होता. त्यामुळे महिमादासला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. भोईर चौकडीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गोळीबारात जखमी झालेल्या महिमादासला गाडीतून नेऊन महाबळेश्वर-वाईच्या दरीत फेकल्याची कबुली दिली. त्यामुळे डोंबिवलीतील रामनगर पोलीस आणि महाबळेश्वर पोलीस यांनी शुक्रवार रात्रीपासून महाबळेश्वर-वाईचा दरी परिसर गिर्यारोहक ांच्या मदतीने पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शनिवार सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.दरम्यान, महिमादासच्या कुटुंबीयांना ही माहिती समजताच त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आमच्या मुलाला जिवंत शोधून आणा, असा टाहो फोडला. मात्र, महिमादासचा शोध न लागल्याने तो नेमका आहे कुठे आणि त्याचे काय झाले, याबाबत पोलीस काही बोलण्यास तयार नाहीत.>आरोपींना व्हीआयपी वागणूक : चौधरीच्या पत्नीचा आरोपआरोपी भोईर चौकडीला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप किशोर चौधरी यांची पत्नी संजीवनी चौधरी यांनी केला आहे. भोईर यांच्या घराबाहेर पोलिसांचा जागता पहारा आहे. पोलीस त्यांना संरक्षण देत आहेत. आमच्या संरक्षणाचे काय, असा सवाल संजीवनी यांनी उपस्थित करू न पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांना विचारले असता, त्यांनी हे सर्व आरोप फे टाळून लावले. पोलिसांचा योग्य दिशेने तपास चालू असल्याचे सांगितले.
अपहृत महिमादास विल्सनचा खून
By admin | Published: May 14, 2017 5:07 AM