पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते, अजब दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात केला. त्यानंतर या दाव्यावर राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटत आहे. याच दरम्यान शिवसेनेचे फायर ब्रँड आणि खासदार संजय राऊत यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या या अजब दाव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. .
संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवबाद साधला. राऊत म्हणाले,अब्दुल कलाम हा अटल बिहारी वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता. मोदी तेव्हा राष्ट्रीय राजकारणात नव्हते. काही लोकं प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात आणि त्यांचा विनोद होतो. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती आता ही छुप्या पद्धतीने आहे,तेव्हा फक्त राष्ट्रपतींच्या सहीने लावली होती. त्या काळातले सेलिब्रेटी कमिटेड होते, स्वातंत्र्य लढा, सामाजिक चळवळीशी संबंध होता
भाजपला काही सवलत मिळते का?दिवसागणिक नव्या उच्चांकाने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवादरवाढीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र मोठे राज्य, पेट्रोल भाव फक्त छोट्या राज्यात कमी, इतर मोठ्या राज्यात बघितले नाही. मोठ्या राज्यात इंधन दरवाढ केल्याने भाजपला सवलत मिळते का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
श्रीधरन मेट्रो मॅन त्यांना शुभेच्छा आहे... मोदींवर कोणी व्यक्तीशः कोणी टीका करत नाही.युपीए सरकारच्या काळापासून मेट्रो मॅन उपाधी मिळाली.पण श्रेय आणि माणसे लाटायची, चोरायची ही नवी भूमिका आहे.
मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नेते, भविष्यात कोरोना संकट वाढू शकेल याचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणून काही गोष्टी उघडू नये असा त्यांचा आग्रह होता. विरोधकांनी धार्मिक राजकारण केल्यावर काहीसे उघडण्यात आले.
ज्या पक्षाची जिथे ताकद तिथे त्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्ते केले आहे. उदा मुंबई, कल्याण, डोंबिवलीत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकत्रित निवडणुकांचे सूत्र ठरलेले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र राहणारचा आहे. काँग्रेसला देखील सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज ठाकरे यांनाही दिसेल, शिवसेनेने अयोध्येत काय केले आहे... मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, राज यांना दिसेल की शिवसेनेने अयोध्येत काय केले आहे. दीड वर्षांपासून आम्ही नव्याने आंदोलन केले, चालना आम्ही दिली. त्यामुळे आज राममंदिर होताना दिसत आहे.