ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ४ - विविध राजकीय पक्षांकडून सध्या होत असलेली अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी राजकीय हेतूने होत असून अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे अथवा कायद्यात दुरुस्ती करणे राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने अॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य असल्याचे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनासाठी येथे आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नजरेसमोर सध्या मुंबई महानगपालितेच्या निवडणुका राजकीय फायदा मिळविण्यासाठीच शिवसेनेकडून अशाप्रकारची मागणी होत असल्याचे आंबेडकर म्हणाले.
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात फिरून परिस्थितीचा आढावा घ्यावा व त्यानंतर याविषीय बोलावे असा टोलाही त्यांनी लगावला. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना उशिरा का होईना आपल्या पुरोगामी विचारधारेची आठवण झाल्याने त्यांची घरवापसी झाल्याचे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान केंद्रातील आणि राज्यातील सरकार आरएसएसकडून चालवले जात असून त्यांचा समाजात वैदिक शिक्षण पद्धती राबवून दलितांना अणि इतर मागास वर्गाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
मध्यावधी निवडणुकांची शक्यता
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता असल्याचे सांगत केवळ राजकीय हेतून अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी विविध राजकीय नेत्यांकडून होत असल्याचे अॅड प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांपूर्वीच राज्यतत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.