पुणो : शैक्षणिक वर्ष 2क्14-15 मध्ये राज्यातील ज्या अनुदानित अध्यापक विद्यालयामध्ये (डीएड) पुरेसे प्रवेश होणार नाहीत, ती विद्यालये बंद करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी दिली. राज्यात पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आल्याचेही जरग यांनी
स्पष्ट केले.
याविषयी अधिक माहिती देताना जरग म्हणाले, की अनुदानित डीएड विद्यालयांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या कमी होत आहे, हे चिंतेची बाब आहे. तरीही कॉलेज सुरू आहेत. अनुदानप्राप्त कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी असणो आवश्यक आहे. परंतु, अशा कॉलेजमध्ये विद्यार्थी पुरेशी नसतील, तर ती विद्यालये बंद करावी लागतील. या विद्यालयांना शासनाकडून अनुदान देण्यात येते. मात्र, काही विद्यालयांमध्ये पुरेसे विद्यार्थी नसल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थी नसताना तेथील शिक्षकांना वेतन देणो, तसेच सोयीसुविधा देणो योग्य नाही. त्यामुळे संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपेक्षित विद्यार्थी संख्या नसलेल्या अनुदानप्राप्त विद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. त्याबाबत संबंधित विद्यालयांना कळविण्यात येईल, असेही जरग यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
राज्यात डीएडचे
1 हजार 61 कॉलेज
4राज्यात सध्या डीएड अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, 16 जूनर्पयत अर्ज भरण्याची मुदत आहे. यावर्षी राज्यात डीएडचे 1 हजार 61 कॉलेज असून, एकूण 86 हजार 465 एवढी प्रवेशक्षमता आहे.
4एकूण डीएड विद्यालयांमध्ये 95 अनुदानप्राप्त आहेत. तर,
अन्य विनाअनुदानित व अल्पसंख्याक आहेत.
4प्रवेशाअभावी यंदाच्या वर्षी 83 विनानुदानित विद्यालये बंद केली आहेत. ‘डीएड’नंतर
नोकरी मिळणो अवघड होत असल्याने, विद्यार्थीसंख्या रोडावत चालली आहे. अनेक विद्यालयांमध्ये पुरेसे विद्यार्थी मिळत नाहीत.