शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

ग्रामीण भागात गर्भपाताचे प्रमाण अधिक; ६० हजारांहून अधिक महिलांचे नैसर्गिक गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:34 AM

गेल्या वर्षभरात राज्यभरात ६० हजार ४९५ नैसर्गिक गर्भपात झाले. त्यात शासकीय रुग्णालयांमधील गर्भपातांची संख्या ३४ हजार ५६३ होती, तर खासगी रुग्णालयांमध्ये २५ हजार ९३२ गर्भपातांची नोंद करण्यात आली.

मुंबई : गेल्या वर्षभरात राज्यभरात ६० हजार ४९५ नैसर्गिक गर्भपात झाले. त्यात शासकीय रुग्णालयांमधील गर्भपातांची संख्या ३४ हजार ५६३ होती, तर खासगी रुग्णालयांमध्ये २५ हजार ९३२ गर्भपातांची नोंद करण्यात आली. यातील मुंबई शहर-उपनगरात एकूण ११ हजार ७६३ गर्भपात झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, राज्यभरात झालेल्या गर्भपातांमध्ये ग्रामीण भागात होणाऱ्या गर्भपाताची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.केंद्रीय आरोग्य विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकेडवारीनुसार, गेल्या वर्षभरात देशभरात ५ लाख ५५ हजार २१३ गर्भपात झाले. त्यात देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे ७५ हजार २०२ गर्भपात झाल्याची नोंद आहे. त्यानंतर महाराष्ट्र व तृतीय स्थानी राज्यस्थानमध्ये ५७ हजार २०६ गर्भपात झाल्याचे आढळून आले आहे. देशाचा विचार करता शहरी भागातील गर्भपाताची संख्या ७२ हजार ६४३ असून ग्रामीण भागातील संख्या ४ लाख ८२ हजार ५७० इतकी लक्षणीय आहे.मुंबईत ११ हजार इतके गर्भपात, पुण्यात ८ हजार ५७१ आणि ठाण्यात ५ हजार ५२८ गर्भपातांची नोंद आहे. या अहवालातील निरीक्षणानुसार, देशभरात होणाºया १० गर्भपातांपैकी एक प्रकरण राज्यातील आहे. याविषयी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कौशिक सिंग यांनी सांगितले, वारंवार होणाºया गर्भपातांपैकी जवळजवळ ८० टक्के गर्भपात हे गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवड्यांतच होतात. यांना फर्स्ट ट्रायमेस्टर अबॉर्शन्स असे म्हणतात. या प्रकारामधील गर्भपातांपैकी ५० ते ६० टक्के गर्भपात हे गर्भातील गुणसूत्रांच्या बिघाडामुळे घडतात. अपंग मूल जन्म घेऊ नये म्हणून निसर्गाने केलेली ही व्यवस्था आहे. याशिवाय गरोदर स्त्रीला मलेरिया, कावीळसारखा गंभीर आजार, गुप्त आजार, पोटावर जोरात पडणे, प्रजोत्पादक अवयवांमध्ये काही समस्या असेल तर गर्भपात (मिसकॅरेज) होऊ शकतो, असे सिंग यांनी सांगितले.तर, गर्भपात त्या दाम्पत्यावर, विशेषत: स्त्रीवर प्रचंड शरीरिक आणि मानसिक आघात करणारे ठरतात. ती अक्षरश: कोलमडून जाण्याची शक्यता असते. या मानसिक अवस्थेचा परिणाम पुढच्या गर्भारपणावर होऊ शकतो. पण काही विशिष्ट चाचण्या आणि योग्य औषधोपचार यामुळे त्यावर मात करता येते आणि गर्भारपण साध्य होते, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नयन शहा यांनी दिली.

टॅग्स :Abortionगर्भपात