शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

२५ ते २९ वयोगटातील तरुणींमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढतेय

By admin | Published: May 13, 2017 1:37 AM

कुटुंबनियोजनाविषयी सर्व स्तरांवर जनजागृती होऊनही गर्भपाताचा पर्याय स्विकारणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते आहे. वेगवेगळ््या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुटुंबनियोजनाविषयी सर्व स्तरांवर जनजागृती होऊनही गर्भपाताचा पर्याय स्विकारणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते आहे. वेगवेगळ््या स्तरातील आणि वयोगटातील तरुणी व महिला अशा वर्गवारीत २००७ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत तब्बल २ लाख ६४ हजार ५१० गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार २५ ते २९ वयोगटातील तरुणींमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुंबई शहर -उपनगरांतील अधिकृत गर्भपात केंद्रांवरील गर्भपाताची नोंद महापालिकेकडे असते. त्यात १२ आठवड्यांपूर्वी, १२ आठवड्यानंतर, वैवाहिक, अविवाहित, १५ वषार्खालील अशा सर्व गर्भपातांचा समावेश असतो. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारान्वये ही माहिती मागितली होती. त्यानुसार २०१४ मध्ये १२ आठवड्याच्या गर्भपातांची संख्या १३९६ तर २०१५मध्ये १३२९ संख्या असल्याचे आकडेवारी सांगते. १२ आठवड्यातील गर्भपात करण्यात आलेल्या तरुणींची संख्या २०१४ मध्ये २८ हजार ५५४ होती, तर २०१५ मध्ये ३२ हजार ७२५ एवढी होती. तर १२ आठवड्यानंतर झालेले गर्भपाताची संख्या २०१४ आणि २०१५ मध्ये अनुक्रमे १३९६, १३२९ एवढी होती. मुंबईत २००७ मध्ये २९ हजार ११६ गर्भपात झाले, तर ६४ मातामृत्यू झाले. तर २००८ साली २४ हजार १७६ गर्भपात झाले व ८१ मातामृत्यू झाले. २००९ साली १६ हजार ७७३ गर्भपात आणि १४९ मातामृत्यूंची नोंद झाली. २०१० साली २० हजार ७६० गर्भपात तर २०६ मातामृत्यू झाले. २०११ मध्ये १९ हजार ७०१ गर्भपात आणि २२२ मातामृत्यू झाले.२०१२ साली २५ हजार ३७४ गर्भपात व २५९ मातामृत्यू झाले. तर २०१३ साली ३० हजार ११७ व २७८ मातामृत्यू झाले. २०१४ साली ३० हजार ७४२ गर्भपात आणि २७६ मातामृत्यू झाले. तर २०१५ साली ३४ हजार ७९० गर्भपात आणि ३०० मातामृत्यू झाले. २०१६ साली ३२हजार ९१६ गर्भपात झाले, तर यावर्षींची मातामृत्यूची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे पालिकेने सांगितले.